Shiv Sena : तू गद्दार आहेस गद्दार… आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर गद्दार उल्लेख! वाद पेटणार?

शिंदे यांच्या गटातील पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा (Shriniwas Vanga) यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरच (Facebook Page) त्यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आलाय! यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Shiv Sena : तू गद्दार आहेस गद्दार... आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर गद्दार उल्लेख! वाद पेटणार?
श्रीनिवास वनगा, आमदार, शिवसेना
Image Credit source: TV9
सागर जोशी

|

Jun 28, 2022 | 9:08 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजलीय. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लूमध्ये सध्या 51 आमदार आहे. या आमदारांच्या विरोधात आणि समर्थनात राज्यभर मोर्चे, आंदोलनं सुरु आहेत. आमदारांचे कार्यालय फोडले जातायत, प्रतिकात्मक पुतळे जाळले जात आहेत, पुतळ्यांना जोडे मारले जात आहेत. तर आमदारांचे समर्थकही रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी शिंदे यांच्या गटातील पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा (Shriniwas Vanga) यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरच (Facebook Page) त्यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आलाय! यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

‘शिवसेना आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडून येऊन सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करणारा,सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार’, असं आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर लिहिण्यात आलंय. इतकंच नाही तर वनगा यांच्या फोटोवरही गद्दार असं लिहिण्यात येऊन तो फोटो या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलाय. तसंच रियल शिवसैनिकाने हे फोस्ट केल्याचं यात म्हटलंय. वनगा यांचा उल्लेख त्यांच्याच अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Shri Niwas Vanga

आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर गद्दार असा उल्लेख

एकनाथ शिंदे संजय राऊत, आदित्य ठाकरेंवर संतापले

राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या टीकेवरुन एकनाथ शिंदे चांगलेच संतप्त झाले आहेत. शिंदे यांनी ट्वीटद्वारे राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिंदे यांनी प्रतिप्रश्न केलाय. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल शिंदे यांनी केलाय.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें