Eknath Shinde: घाबरतो थोडाच? शरद पवारांच्या मुंबईत येण्याच्या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेची थेट प्रतिक्रिया

दोन तृतीयांशांपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे पुढची रणनीती ठरवण्यासाठी आमच्या कडे संख्याबळ आहे. आता सर्व आमदारांची बैठक झाल्यानंतर यात काय निर्णय होईल, तो कळवला जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

Eknath Shinde: घाबरतो थोडाच? शरद पवारांच्या मुंबईत येण्याच्या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेची थेट प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 6:00 PM

मुंबईः एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेलेले आमदार कुठेही गेले तरी त्यांना महाराष्ट्रात यावंच लागेल. राज्यपालांसमोर किंवा विधानसभेत बोलावं लागेल. फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिला आहे. आम्ही महाराष्ट्रात यायला घाबरतो थोडीचे? विधासभेच्या नियमात ज्या गोष्टी आहेत, त्यानुसार करावच लागेल. याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. आज टीव्ही9 सोबत फोनवरून बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. गुवाहटी येथे एकनाथ शिंदे समर्थित आमदारांची महत्त्वाची बैठक आज होत आहे. या बैठकीनंतर शिंदेंचा गट पुढे काय रणनीती आखणार आहे, हे स्पष्ट होईल.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी टीव्ही9 शी फोनवर बोलताना माहिती दिली की, सध्या आमच्याकडे शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत तर आठ ते 10 अपक्ष आमदारांचा पाठींबा आहे. त्यामुळे दोन तृतीयांशांपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे पुढची रणनीती ठरवण्यासाठी आमच्या कडे संख्याबळ आहे. आता सर्व आमदारांची बैठक झाल्यानंतर यात काय निर्णय होईल, तो कळवला जाईल.’

शरद पवार काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपची फूस असेल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. आमदारांनी आधी इथे यावं. इकडे आल्यानंतर त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते मार्गदर्शन करतील असं वाटत नाही. या आमदरांनी घेतलेला हा निर्णय पक्षांतर बंदी कायद्याविरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदार संघातही याची प्रतिक्रिया उमटेल. त्यामुळेच लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली आहेत.

मुंबई-कोकणात शिवसैनिक आक्रमक

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाविरोधात उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई तसेच कोकण परिसरातील काही भागात शिवसैनिक निदर्शनं करत आहेत.  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही बंडखोर आमदारांची वापसी न झाल्यामुळे शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिंदे गटाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.