AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली, ‘या’ तारखेला होणार मतमोजणी; कारण काय?

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पाचही राज्यात काँग्रेस मुसंडी मारताना दिसत असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी या राज्यातील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्याआधीच एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी मिझोराममध्ये मतमोजणी होणार नाही. त्यामुळे त्या दिवशी या राज्याचा निकालही लागणार नाहीये.

सर्वात मोठी बातमी ! मिझोराम निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली, 'या' तारखेला होणार मतमोजणी; कारण काय?
Mizoram Assembly ElectionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2023 | 9:01 PM
Share

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. पाचही राज्यातील निकाल येत्या रविवारी म्हणजे 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. या पाच राज्यांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. मात्र, मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलण्यात आली आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या दिवशी मिझोरामची मतमोजणी होणार नाही आणि निकालही जाहीर होणार नाहीत. त्यामुळे देशभरातील जनतेला मिझोरामचा निकाल एक दिवस उशिराने समजणार आहे.

मिझोराममध्ये आता रविवार 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून 4 डिसेंबरलाच निकाल लागणार आहेत. मिझोराममधील जनता आणि राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मिझोराममधील अनेक भागातील निवडणूक आयोगाकडे अर्ज आले होते. त्यात निकालाची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. मिझोराममधील लोकांसाठी रविवारचा दिवस खास असतो. या खास दिवशी मतमोजणी करू नये, असा आग्रह जनतेने धरला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतमोजणीची तारीख बदलली आहे.

इतर निकालाची तारीख जैसे थे

नागरिकांच्या भावनांची कदर करून केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मिझोराममध्ये 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. मात्र, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणातील मतमोजणी 3 डिसेंबर रोजीच होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

रविवार पवित्र दिवस

राजकीय पक्षांनीही रविवारी निकाल न लावण्याचा आग्रह धरला होता. रविवार हा ख्रिश्चनांचा पवित्र दिवस असतो. त्यामुळे ख्रिश्चनांची संख्या अधिक असलेल्या राज्यातील निकालाची तारीख बदलली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. भाजप, काँग्रेस आणि सत्ताधारी एमएनएफही नागरिकांच्या भावनेशी सहमत होते.

रविवारी कोणताही कार्यक्रम नाही

नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. मिझो लोक रविवारचा दिवस पूजा अर्चेत घालवत असतात. त्यामुळे रविवारी मतमोजणी करू नये. या पत्रावर सर्व राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांच्या अध्यक्षांची सही आहे. मिझोराममध्ये रविवारी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम ठेवला जात नाही, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.