AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाणावर आज निर्णयाची शक्यता; …म्हणून चिन्ह शिंदे गटालाच मिळणार, शंभूराज देसाईंचा दावा

सध्या धनुष्यबाण चिन्हावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

धनुष्यबाणावर आज निर्णयाची शक्यता; ...म्हणून चिन्ह शिंदे गटालाच मिळणार, शंभूराज देसाईंचा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2022 | 9:44 AM
Share

मुंबई:  सध्या धनुष्यबाण चिन्हावरून शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना आणि शिंदे गट दोघांकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे. आता याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. याबाबत आयोगाकडून आजच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादावर निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्याता आहे. शिवसेनेच्या वतीने आज निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे  धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार असा दावा शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला आहे.

काय आहे शंभुराज देसाई यांचा दावा?

धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी केला आहे.  नगरसेवक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अगदी सरपंचाचे सुद्धा बहुमत शिंदेसाहेबांकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांच्या नियमावालीनुसार बहुमताच्या दृष्टीने विचार केल्यास धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.

शिवसेनेचा निशाणा

तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. आमदार आणि खासदार मूळ पक्ष होत नाही, शिंदे गट डमी, भाजप सूत्रधार असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाकडून कवच कुंडल काढण्याचा प्रयत्न होत आहे. कवच कुंडल काढणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ