
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. या वेळी भाषण करताना अनेक नेत्यांनी मिश्किल टोलेबाजीही केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यातील या खास कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘पुण्यात दोन दादा आहेत. एक दादा म्हणजे अजित दादा आणि दुसरे म्हणजे चंद्रकांत दादा. पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत. काही लोक दादागिरी करत नाहीत परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसते’ असं विधान केलं आहे.
यानंतर भाषण करताना अजित पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. चंद्रकांतदादा दादागिरी करत नाहीत. म्हणजे मी दादागिरी करतो का? असा सवाल अजित पवारांनी फडणवीसांना केला. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला. तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी चंद्रकांत दादांना लोक अजूनही पुणेकर मानत नाहीत असंही अजित पवारांनी म्हटलं.
नितीन गडकरींचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार आज नितीन गडकरी यांना मिळत आहे. नितीन गडकरींनी अनेक प्रयोग केले अनेक प्रयोग अंगावर आले अनेकदा कर्जबाजारी झाले पण ते कधीच निराश झाले नाहीत. कितीही कठीण प्रसंग जरी आला तरी त्या प्रसंगावर मात करण्यासाठी धैयर्याने सामोरे जायचं हा त्यांच्यातील महत्त्वाचा गुण आहे.
गडकरींची एक आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की, ‘पुणे मुंबई हायवे साठी 3600 कोटी रुपयांचा टेंडर रिलायन्सने भरलं होतं. नितीन गडकरींना ते जास्त वाटलं सतराशे अठराशे कोटीत काम होऊ शकते असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी ठरवलं की मी हे टेंडर देणार नाही. धीरूभाई अंबानी खूप मोठे उद्योजक होते त्यांनी जेवणासाठी निमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की, जे तुम्ही काम करू शकणार नाही हे सरकार काम करू शकणार नाही हे काम कठीण आहे हे काम तुम्ही आम्हाला द्या.
नितीनजींनी धीरूभाईंना सांगितलं, धीरूभाई हे काम अर्धा किमतीमध्ये मी करून दाखवेल आणि त्या दिवशी तुम्ही मला जेवायला बोलवा. मी तुमच्याकडे जेवायला येईल अशा प्रकारची शर्यत नितीन गडकरींनी लावली आणि तो हायवे 1500 कोटीत करून दाखवला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नितीन गडकरींचे गुण ओळखले. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक काम करणार व्यक्तिमत्व दुसरं कोणीच नाही केवळ गडकरी आहेत. आपण पाहिलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरत हे नितीनजींनि दाखवलं. जे मनात येईल ते बोलणारे देखील नितीन गडकरी आहेत
त्यांनी कधीच असा विचार केला नाही की बोलल्यानंतर काय परिणाम होईल, अनेकदा राजकारणात सत्य माहित आहे पण ते बोलू नये असा पण ठरवतो दरवेळेस सत्य बोलल्याने फायदा होतो असं नाही. अनेकदा राजकारणात नुकसान देखील होतो पण असं परिस्थिती आली तर नितीनजी हमखास बोलतील तिथे नुकसान झालं तरी ते बोलत असतात
10 वर्षापूर्वी गडकरी सांगायचंचे आता इलेक्ट्रिकल व्हेईकलचा जमाना आलेला आहे. गडकरी यांनी संस्कार जोपासले आहेत, भारत मातेची सेवा करण्याकरता भारत मातेने आपल्याला उदंड आयुष्य देवो. असं फडणवीसांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.