प्रदीप शर्मांवर पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

प्रचाराच्या तोफा थंडावताच नालासोपारा विधानसभेत बहुजन विकास आघाडी आणी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजीला (Fighting in Shivsena and BVA in Nalasopara) सुरुवात झाली आहे.

प्रदीप शर्मांवर पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

नालासोपारा : प्रचाराच्या तोफा थंडावताच नालासोपारा विधानसभेत बहुजन विकास आघाडी आणी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजीला (Fighting in Shivsena and BVA in Nalasopara) सुरुवात झाली आहे. शनिवारी (19 ऑक्टोबर) सायंकाळी 5 वाजता प्रचार संपला, मात्र, त्यानंतर रात्री लगेचच कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी (Fighting in Shivsena and BVA in Nalasopara) झाली. बहुनजन विकास आघाडीच्या (बविआ) कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार यांच्यावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. त्यानंतर झालेल्या वादाचे रुपांतर थेट राडेबाजीत झाले.

शिवसेनेचे विधानसभा उमेदवार प्रदीप शर्मा रात्री 10 वाजताच्या सुमारास आपल्या ताफ्यासह नालासोपारा पश्चिम निळेमोरे गावात गेले. त्यावेळी शर्मा पैसे वाटायला आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी प्रदीप शर्मा यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी बहुजन विकास आघाडीचे 500 हून अधिक कार्यकर्ते हजर होते. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी बविआ, शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

अखेर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेचे उमेदवार शर्मा यांचा ताफा काढून दिला. पोलिसांच्या कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रात्री 2 वाजेपर्यंत वसई आणि नालासोपाऱ्यात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.

या राडेबाजीत दगडफेकही झाली. त्यात शर्मा यांच्या ताफ्यातील इनोव्हा कारच्या काचाही फुटल्या आहेत. या गाडीवर कुणी दगडफेक केली याचा पोलीस तपास करत आहेत. याबाबत पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, प्रचार संपल्यानंतर पैसे वाटप करण्यासाठी आल्याबद्दल तक्रार देऊन गुन्हा दाखल करणार असल्याचं मत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बविआच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक निवडणुकीत अशीच दादागिरी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर छावणीचे स्वरुप

प्रदिप शर्मा वसईच्या सनसिटी परिसरात भाडे तत्वावर बंगला घेऊन राहत आहेत. मात्र, बविआच्या कार्यकर्त्यांनी शर्मांवर पैसे वाटपाचा आरोप करत सनसिटी परिसरात जमण्यास सुरुवात केली. बविआच्या शेकडो कार्यकर्ते वसईच्या मुख्य रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे तेथील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि सनसिटी परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले.

नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याठिकाणी काही गाड्यांची तोडफोड झाली आहे. त्याचा तपास करून कारवाही करण्यात येईल असे आश्वासन वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिले आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI