पटोले-फुके समर्थकांमध्ये राडा, पटोलेंविरोधात अपहरणाची तक्रार

साकोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा जोरदार हाणामारी (Fighting between Supporter of Nana Patole Parinay Fuke) झाल्याची घटना घडली.

पटोले-फुके समर्थकांमध्ये राडा, पटोलेंविरोधात अपहरणाची तक्रार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 19, 2019 | 2:11 PM

भंडारा : साकोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा जोरदार हाणामारी (Fighting between Supporter of Nana Patole Parinay Fuke) झाल्याची घटना घडली. या हाणामारीत नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा अन्य एक सहकारी देखील यात जखमी झाला. परिणय फुके यांनी नाना पटोलेवर भावाच्या अपहरणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी नाना पटोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरणाची तक्रारही दाखल झाली आहे.

परिणय फुके यांचे समर्थक पैसे वाटत होते. यावेळी त्यांना हटकल्याने त्यांनी हल्ला केल्याचा (Fighting between Supporter of Nana Patole Parinay Fuke) आरोप पटोले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी फुके गटाच्या कार्यकर्त्यांकडून 17 लाख 74 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच परिणय फुके, दिपक लोहिया आणि इतर 30 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पटोले आणि फुके गटाने साकोली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

डॉ. परिणय फुके बहे भंडाऱ्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील या प्रकरणात पटोले गटावर आरोप केले आहेत. पटोले यांच्या कार्यकर्त्यांनी माझा भाऊ नितीन फुके यांचं अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, परिणय फुके यांनी केला आहे. या प्रकरणी नाना पटोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत परिणय फुके यांचा भाऊ पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. फुके यांच्या भावाने नाना पटोलेंच्या कार्यकर्त्यांवर प्रचारासाठी जाताना हल्ला केल्याचा आरोप पटोले कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या घटनांमुळे साकोली मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें