AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबाचे समर्थन करणं भोवलं, माजी आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाचे समर्थमन करणारे वक्तव्य केलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगजेबाचे समर्थन करणं भोवलं, माजी आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Aasif Shekh
| Updated on: Jun 24, 2025 | 10:25 PM
Share

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाचे समर्थमन करणारे वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजपने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माजी आमदार आसिफ शेख यांनी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कार्यक्रमानंतर सोबत बोलताना, ‘औरंगजेब पवित्र माणूस होता, टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करायचा. औरंगजेब सर्व धर्मांना माननारा सर्वधर्मसमभाव विचाराचा होता. मात्र, औरंगजेबाला बदनाम करण्यासाठी राजकारणासाठी त्याच्या नावाचा उपयोग केला जात आहे, असं विधान केलं होतं. आता शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

माजी आमदार आसिफ शेख यांच्या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने दत्ता गायकवाड, पुणे यांनी केली हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर आता आसिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत आसिफ शेख?

आसिफ शेख रशीद हे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून 2014 साली विजयी झाले होते. 2019 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते .2019 मध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून आसिफ यांनी पुन्हा एकदा काँग्रेसने तिकीट दिले होते, मात्र एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माइल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

2022 मध्ये आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यांचे वडील शेख रशीद यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, आसिफ शेख यांनी 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी 20 ऑक्टोबर 2024 रोजी ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ म्हणजे ‘इस्लाम’ हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आणि 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणुक मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.