उत्तर प्रदेशमध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार

लखनौ : उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना कैराना लोकसभा क्षेत्रातील शामली येथे गुरुवारी (4 एप्रिल) घडली. पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान शामली मतदान केंद्रावर काही अज्ञात लोक मतदान ओळखपत्राशिवाय मतदान करण्यातकरीता आले होते. यावेळी त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान करु दिले नाही. त्यामुळे या अज्ञातांनी मतदान केंद्राबाहेर गोळीबार […]

उत्तर प्रदेशमध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

लखनौ : उत्तरप्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना कैराना लोकसभा क्षेत्रातील शामली येथे गुरुवारी (4 एप्रिल) घडली. पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान शामली मतदान केंद्रावर काही अज्ञात लोक मतदान ओळखपत्राशिवाय मतदान करण्यातकरीता आले होते. यावेळी त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान करु दिले नाही. त्यामुळे या अज्ञातांनी मतदान केंद्राबाहेर गोळीबार केला. यानंतर त्यांना पळवण्यासाठी बीएसएफ जवानांनीही हवेत गोळीबार केला.

जिल्हाधिकारी म्हणाले, “काही अज्ञात लोक मतदान ओळखपत्राशिवाय मतदान करण्यासाठी आले होते. मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही. तसेच मतदानही करु न दिल्याने त्यांनी गोळीबार केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बीएसएफ जवानांनी हवेत गोळीबार केला. सध्या इथे मतदान सुरुळीत सुरु आहे”. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये स्पष्टपणे बीएसएफ जवान गोळीबार करताना दिसत आहे.

कैराना मतदारसंघात 5 लाख मुस्लीम मतदार आहेत. तर 4 लाख मागासवर्गीय (जाट, गुर्जर, सैनी, कश्यप, प्रजापती आणि इतर) मतदार आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून गंगोहचे आमदार प्रदीप चौधरी निवडणूक रिंगणात आहेत. सपा-बसपा आघाडीकडून तबस्सुम बेगम आणि काँग्रेसकडून हरेन्द्र मलिक निवडणूक रिंगणात आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हुकुम सिंह यांनी कैराना लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सपाच्या पाठिंब्याने आरएलडी पक्षाच्या तबस्सुम बेगम यांनी या मतदार संघात विजय मिळवला होता.

आरएलडीच्या तिकिटावर तबस्सुम हसनने भाजपच्या मृगांका सिंह यांचा 44618 मतांनी पराभव केला होता. आता भाजपने प्रदीप चौधरी यांना कैराना मतदारसंघातून निवडणुकीचे तिकिट दिलं आहे. प्रदीप चौधरी नकुड आणि गंगोहमधून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.