AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार संजय धोत्रे : शेतकरी चळवळीतला नेता मोदींच्या मंत्रिमंडळात

अकोला : सलग चौथा विजय मिळवून खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित करून त्यामध्ये आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. धोत्रे यांच्यातील नेतृत्वगुण हेरत भाजपकडून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. खा. धोत्रे यांच्या रूपात अकोला जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा मान मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले […]

खासदार संजय धोत्रे : शेतकरी चळवळीतला नेता मोदींच्या मंत्रिमंडळात
| Edited By: | Updated on: May 30, 2019 | 6:04 PM
Share

अकोला : सलग चौथा विजय मिळवून खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित करून त्यामध्ये आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. धोत्रे यांच्यातील नेतृत्वगुण हेरत भाजपकडून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड करण्यात आली. खा. धोत्रे यांच्या रूपात अकोला जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा मान मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.

विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेत अमरावती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी, जनरल सेक्रेटरी म्हणून सुरुवात करणारे खासदार संजय धोत्रे यांचा राजकीय प्रवास वाखणण्यासारखा आहे. आपले मत परखड आणि सत्यता मांडण्याची त्यांची शैली सर्वांना भावणारी आहे. आपल्या जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी, अन्यायाविरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी त्यांनी शेतकरी चळवळीत हिरीरीने सहभाग नव्हे, तर लढा दिला. त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीने ते राष्ट्रीय राजकारणात पोहोचले. त्यांचे नियोजन आणि अथक परिश्रम, विकास कामांमुळे ते राष्ट्रीय राजकारणात समरस झाले.

1959 मध्ये अकोला जिल्ह्यातील पळसो बढे या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या संजय श्यामराव धोत्रे यांनी अभियांत्रिकीमध्ये मेकॅनिकल पदवी प्राप्त केली. आपल्या कुटुंबाचा पारंपरिक शेती व्यवसाय बघताना माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी उत्पादन निर्मिती, अ‍ॅग्रो फूड प्रोसेसिंग व्यवसायतही ते उतरले. हा व्यवसाय करताना कोणत्याही गोष्टीचा मुळापासून अभ्यास करण्याची सवय त्यांना लागली. हीच सवय पुढे त्यांना राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उपयोगी पडलेली असावी.

धोत्रे यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचा योग्य प्रकारे वापर करीत त्यांनी शेतकऱ्यांना योग्य सल्ला प्राप्त व्हावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात केली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जिल्ह्यात भाजपाचा विस्तार झाला. एकापाठोपाठ जिल्ह्यात भाजपाचे आमदार, महापालिकासारख्या निवडणुकीत मोठा विजय झाला. व्यवसायातील प्रचंड मेहनतीमुळे त्यांना 1987 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उद्योजकता पुरस्कार मिळाला. कृषी क्षेत्रात अतुलनीय कामाबद्दल 1999 मध्ये त्यांना स्व. वसंतराव नाईक मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच त्यांना 1999 मध्ये मूर्तिजापूर विधानसभामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार म्हणून पहिला विजय प्राप्त केला होता. आज संजय धोत्रे हे केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेत असल्याने कार्यकार्यत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.