सत्यानाश होईल साल्यांचा, बाळासाहेबांनी…ठाकरे गट सोडणाऱ्यांवर बडा नेता संतापला; पुढचा प्लॅनही सांगितला!

राज्यपातळीवरील नेते महापालिका, जिल्हा परिषदा हातातून जाऊ नयेत म्हणून ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात बोलवून घेत आहेत. गेल्या काही दिवसांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. असे असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फुटून गेलेल्यांचा सत्यानाश होईल. बाळासाहेबांनी मोठं केलं तरी साले फुटतात, असा थेट हल्लाबोल केलाय.

सत्यानाश होईल साल्यांचा, बाळासाहेबांनी...ठाकरे गट सोडणाऱ्यांवर बडा नेता संतापला; पुढचा प्लॅनही सांगितला!
uddhav thackeray
| Updated on: Aug 23, 2025 | 9:24 PM

Chandrakant Khaire : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्य तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचे राजकारण जोर धरू लागले आहे. काही ठिकाणी तर स्थानिक पदाधिकारी ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर राज्यपातळीवरील नेते महापालिका, जिल्हा परिषदा हातातून जाऊ नयेत म्हणून ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात बोलवून घेत आहेत. गेल्या काही दिवसांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. असे असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे निष्ठावंत मानले जाणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी फुटून गेलेल्यांचा सत्यानाश होईल. बाळासाहेबांनी मोठं केलं तरी साले फुटतात, असा थेट हल्लाबोल केलाय.

चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत खैरे आज (23 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिक शिवसंपर्क मोहिमेच्या पूर्वतयारी शिबिरात बोलत होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी जोरदार बॅटिंग केली. फुटून गेलेल्या साल्यांचा सत्यानाश होईल, असं म्हणत खैरेंनी बंड केलेल्या आणि पक्ष सोडून सात असलेल्यांप्रती संताप व्यक्त केला. बाळासाहेबांनी मोठे केले तरी साले फक्त पैशांसाठी फुटतात. यांचा सत्यनास होईल…सत्यनास…आम्ही तर प्लॅनिंग केले आहे की एका एकाला कसे पाडायचे? त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला.

अंबादास दानवे यांचे केले तोंडभरून कौतुक

पक्षातील अंतर्गत शिस्त कशी असावी, यावरही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. पक्षात कडक शिस्त पाहिजे. नाहीतर मी आणि अंबादास म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाहेरच्या नेत्याने शिस्त लावली की मग ऐकतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे अंबादास दानवे यांचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. जिल्ह्यात आज आपली अशी परिस्थिती आहे की आमदार, खासदार आपल्याकडे नाही. पण धडाडीचे विरोधी पक्षनेता आहे.अंबादासने विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम केले आहे .मी पण त्याला अनेक वेळा कसे काम करायचे हे सांगत होतो. अधिकाऱ्यांवरदेखील त्याने चांगला वचक ठेवला, अशी स्तुती खैरे यांनी केली.

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का

दरम्यान, एकीकडे ठाकरे गटाचे शिवसंपर्क मोहीम पूर्वतयारी शिबीर चालू असताना दुसरीकडे याच शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. येथे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एकीकडे खैरे पक्ष सोडून गेलेल्यांना पाडण्याची भाषा करत असतानाच दुसरकीकडे माजी महापौरानेच सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आता संभाजीनगरच्या राजकारणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.