Suresh Kalmadi passed away : मोठी बातमी! माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन
Suresh Kalmadi passed away : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. सुरेश कलमाडी यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. ते सक्रिय राजकारणातूनही दूर होते. सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. सुरेश कलमाडी यांनी मोठा काळ राजकारणात गाजवला. क्रीडा क्षेत्रातही मोठे काम सुरेश कलमाडी यांचे राहिले आहे. काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने मोठा धक्का लोकांना बसलाय. पुण्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सुरेश कलमाडी पुण्यातील राजकारणात सक्रिय होते. आपले अर्धे आयुष्य कलमाडींनी राजकारणात घालवले. सुरेश कलमाडी यांच्या निधनाबद्दल कळताच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. आज दुपारी 2 वाजता सुरेश कलमाडी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल.
भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री
सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सुरूवात केली. त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले. केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार हेच नाही तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील होते. पक्षानेही वेळोवेळी सुरेश कलमाडी यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपावल्या. पुण्याचे नाव लाैकिक त्यांनी जगभरात पोहोचवले.
क्रीडा क्षेत्रात विशेष योगदान
सुरेश कलमाडी यांनी 1935 साली पाकिस्तान आणि 1971 मध्ये बांगलादेश तेव्हायाच पूर्न पाकिस्तान विरोधात भारतीय वायूसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावले होते. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधून इंडियन एअर फोर्समध्ये 1960 मध्ये दाखल झाले होते. अनेक वर्ष त्यांनी देशासाठी सेवा बजावली. 1974 मध्ये त्यांनी निवृत्ती स्विकारली आणि ते राजकारणात दाखल झाले.
1982 साली राज्यसभा खासदार
कॉंग्रेस पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. संजय गांधीचे निकवर्तीय सुरेश कलमाडी मानले जात. 1982 साली ते राज्यसभा खासदार झाले. कायमच त्यांची रूची खेळामध्ये होती. देशातील क्रिडा क्षेत्र कशाप्रकारे पुढे नेता येईल, याकरिता ते प्रयत्न करत. मात्र, सुरेश कलमाडी यांच्यावर यादरम्यान भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. अनेक मोठ्या स्पर्धांचे ते पुण्यात आयोजन करत.
