दानवेंनी जास्त फडफड करू नये, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्केंचा इशारा

यंदाचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचाच होणार आणि तोदेखील शिवाजी पार्कमध्ये होणार, असं नरेश मस्के यांनी ठणकावून सांगितलं.

दानवेंनी जास्त फडफड करू नये, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्केंचा इशारा
नरेश मस्के, माजी महापौर, ठाणेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 3:21 PM

ठाणेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जास्त फडफड करू नये, नाही तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के (Naresh Maske) यांनी दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेल्या आमदारांची गद्दारी जनतेला आवडेली नाही. त्यामुळे जनता त्यांच्याकडे पाठ फिरवतेय, अशी टीका अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केली. याला नरेश मस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यासोबतच त्यांनी सामना वृत्तपत्रातून एकनाथ शिंदे सरकारवर झालेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिलंय.

अंबादास दानवेंना प्रत्युत्तर

शिंदेसेनेतील बंडखोरांवरील दानवेंच्या टीकेवर उत्तर देताना नरेश मस्के म्हणाले, अंबादास दानवेंना विचारतं कोण? अंबादास दानवे यांनी जास्त फडफड करू नये, नाहीतर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही… त्यांना नेतेपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदेंनी किती मेहनत घेतली ते विचारा… आत्ता ठाणे आठवलं का त्यांना? जास्त बोललं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल…

विनाशकाले विपरीत बुद्धी

हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुले फक्त मंत्र्यांसाठी देव कोरडेच… अशी टीका सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावर बोलताना नरेश मस्के म्हणाले, ‘ सामनातून आमच्यावर केलेली टिका म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी…ज्यांनी कुणी हा आग्रलेख लिहीलाय त्याचे धन्यवाद देईन की त्याने हे मान्य केलं ते हिंदूत्व टिकवू शकले नाहीत…

शिवाजी पार्कात शिंदेंचा दसरा मेळावा

यंदाचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचाच होणार आणि तोदेखील शिवाजी पार्कमध्ये होणार, असं नरेश मस्के यांनी ठणकावून सांगितलं. ते म्हणाले, ठाकरे यांना तिथे मेळावा घेण्याचा अधिकार नाहीये. हा अधिकार केवळ बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना आहे.. म्हणजे आम्हाला आहे…

भाजप-मनसे युती?

राज्यात सध्या भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याकडे राज्याचं लक्ष आहे. यावर नरेश मस्के म्हणाले, ‘ अमित शाह येत आहेत त्याचं स्वागत, पण युतीचा निर्णय हा केवळ आमचे साहेब घेतील… काल राज ठाकरे यांच्या घरची भेट ही केवळ दर्शनासाठी घेतलेली भेट होती, त्याचा राजकिय अर्थ काढण्यात काही फायदा नाही…

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.