AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही विधानसभा शेवटची, आता दिल्लीत पाठवा, माजी राज्यमंत्र्यांची पवारांना जाहीर मंचावर गळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. ‘ही विधानसभा शेवटची’ अशी घोषणा करत आत्राम यांनी थेट शरद पवारांकडेच भविष्यात दिल्लीत नेण्याची मागणी केली आहे

ही विधानसभा शेवटची, आता दिल्लीत पाठवा, माजी राज्यमंत्र्यांची पवारांना जाहीर मंचावर गळ
शरद पवार, धर्मराव बाबा आत्राम
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 1:57 PM
Share

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री आणि गडचिरोलीतील विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम (Dharmrao Baba Atram) यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर मोठी घोषणा करत खळबळ उडवून दिली आहे.‘ही विधानसभा शेवटची’ अशी घोषणा करत आत्राम यांनी भविष्यात दिल्लीत नेण्याची गळ शरद पवार यांना घातली आहे. त्यामुळे धर्मराव बाबा आत्राम भाजपात जाण्याच्या चर्चा सुरु असताना आता ते राष्ट्रवादीतच लोकसभेसाठी फील्डिंग लावत आहेत का, अशीही चर्चा रंगली आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. ‘ही विधानसभा शेवटची’ अशी घोषणा करत आत्राम यांनी थेट शरद पवारांकडेच भविष्यात दिल्लीत नेण्याची मागणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज अर्थात वडसा भागात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आत्राम यांनी थेट मंचावरुनच पवारांना गळ घातली.

धर्मराव बाबा आत्राम कोण आहेत?

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा एक मध्यबिंदू मानला जातो. या विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम चार वेळा निवडून आले आहेत. आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. अहेरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र तिथे खिंडार पडल्यानंतर धर्मराव बाबांचा एकदा अपक्ष दीपक आत्राम आणि दुसऱ्यांदा पुतणे आणि भाजप उमेदवार अंबरीश आत्राम यांनी पराभव केला होता. मात्र 2019 मध्ये धर्मराव बाबांनी पुन्हा निवडणूक जिंकली.

लोकसभा लढवण्यात अडचण काय?

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. सध्या भाजपचे अशोक नेते येथून सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. मात्र त्याआधी अनेक वर्ष हा गड काँग्रेसने राखला होता. आता जागावाटपात तो काँग्रेसकडे गेल्यास, धर्मराव बाबा आत्राम कुठून लोकसभा निवडणूक लढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता

आगामी विधानसभेला महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे सामोरे जाऊन निवडणुकीनंतर पुन्हा आघाडी स्थापन करु शकतात. मात्र लोकसभा निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाण्याऐवजी आघाडीतील जुने सहकारी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याचीच शक्यता अधिक आहे. आता आत्राम यांनी थेट लोकसभेचं तिकीट मागितल्यामुळे गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून लढायचं झाल्यास त्यावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता आहे.

पवारांना हिऱ्याच्या काट्यांचं घड्याळ

दरम्यान वडसा येथे शरद पवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार यांना हिऱ्याचे काटे असलेले हिऱ्याची घड्याळ भेट दिले. त्यासोबत लाकडावर कोरलेली संविधानाची प्रस्ताविकाही त्यांनी पवारांना भेट दिली.

संबंधित बातम्या :

गडचिरोली लोकसभा : काँग्रेस आणि भाजपाला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण

नाना पटोले पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महत्त्वाची चर्चा ?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.