AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Naik and Deepa Chauhan : गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान राष्ट्रवादीच्या वाटेवर! राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांना पत्र

दीपा चौहान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली आहे.

Ganesh Naik and Deepa Chauhan : गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान राष्ट्रवादीच्या वाटेवर! राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांना पत्र
गणेश नाईक आणि त्यांच्यावर आरोप करणारी पीडित महिलाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 4:23 PM
Share

नवी मुंबई : भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर दीपा चौहान या महिलेनं गंभीर आरोप केलाय. चौहान यांनी गणेश नाईकांवर बलात्कारासारखा गंभीर आरोप केलाय. नाईक यांच्यासोबत मी पूर्व संबंधात होते. त्या संबंधातून मुल झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली, माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप चौहान यांनी केलाय. त्यानंतर आता दीपा चौहान (Deepa Chauhan) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. दीपा चौहान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नवी मुंबई जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली आहे. त्यामुळे दीपा चौहान यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षात प्रवेश दिल्यास गणेश नाईकांच्या अडचणीत अजून भर पडण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक DNA चाचणीलाही तयार

गणेश नाईक यांना आज अंतरिम जामीन अर्जावर काल ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी गणेश नाईक आणि फिर्यादी या दोघांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला. या युक्तिवादात गणेश नाईक आणि फिर्यादी च्या वकिलांनी आपली बाजु मांडली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश नाईक यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणात गणेश नाईक यांची आम्हाला वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला नाईक यांची कस्टडी हवी आहे अशी विनंती नेरुळ पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी ठाणे सत्र न्यायालयात केली. तर फिर्यादीच्या आरोपांना उत्तर देताना गणेश नाईक हे डीएनए चाचणीसाठी तयार असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलाने केला आहे.

पीडित महिलेचा नेमका आरोप काय?

गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी गंभीर आरोप केलेत. माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. गेली 27 वर्षे मी गणेश नाईक यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. गणेश नाईक मला नुसते आश्वासन द्यायचे. आमच्या संबंधातून मला एक मुलगाही आहे. नाईकांनी मला आश्वासन दिलं होतं की, मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. परंतू त्यांनी तसं काहीच केलं नाही. नाईकांनी आम्हाला कोणतंच आर्थिक पाठबळ दिलं नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुलगा झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझं लैंगिक शोषण झालं, असा चौहान यांनी केलाय.

तसंच नाईक आणि त्यांच्या परिवारानं मला अनेकवेळा अपमानास्पद वागणूक दिली. अनेकवेळा त्यांच्या मुलाकडून मला धमक्याही देण्यात आल्या. एकदा माझा मुलगा त्यांच्या बालाजी टॉवर या राहत्या घरी गेल्यावर त्याला हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मी स्वत: मुलाला घेऊन गेल्यानंतर आम्हाला हाकलून देत, अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

माझा शारीरिक आणि मानसिक छळ नाईक यांनी केलाय. आता त्यांच्याविरोधात अनेक संघटना, पक्ष पुढे येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी होतेय. पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. मला न्याय आणि माझा हक्क मिळाला पाहिजे. मी वकिलामार्फत माझी लढाई लढत आहे, अशी माहितीही चौहान यांनी दिलीय.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.