Rajasthan : गेहलोत अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात..? राज्यस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण?

अध्यक्षपदाबरोबर राज्यस्थानचे मुख्यमंत्री पदही आपल्याकडेच असावे अशी धारणा गेहलोत यांची होती. मात्र, एक पद-एक व्यक्ती हेच कॉंग्रेसचे सूत्र असल्याने गेहलोत यांचे अपेक्षांचे काय होणार हे महत्वाचे आहे.

Rajasthan : गेहलोत अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात..? राज्यस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण?
सचिन पायलट आणि अशोक गेहलोत
राजेंद्र खराडे

|

Sep 23, 2022 | 7:15 PM

मुंबई : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी (Congress President) कोणाची वर्णी? यावरुन राळ उडाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये शशी थरुर, राहुल गांधी आणि राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची नावे आघाडीवर आहेत. अध्यक्षपदासह राज्यस्थानचे मुख्यमंत्री पदही आपल्याकडेच रहावे यासाठी अशोक गेहलोत यांनी सर्वस्व पणाला लावले होते. पण आता त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने जर गेहलोत हे अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असतील तर मात्र, राज्यस्थानचे मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) होऊ शकतात असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आपण स्वत: किंवा आपल्या मर्जीतला मुख्यमंत्री रहावा हे अशी आशा बाळगलेल्या गेहलोतांचे काय होणार हे पहावे लागणार आहे. मात्र, सचिन पायलट यांना दूर ठेवण्यासाठी त्यांचे सर्वकश प्रयत्न हे सुरु आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मुख्यमंत्री अशोत गेहलोत उतरले तर मात्र, राज्यस्थानचे मुख्यमंत्री पद हे सचिन पायलटकडे जाणार असे संकेत मंत्री राजेंद्र गुड्डा यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर बसपाच्या आमदारांचा देखील पायलट यांना पाठिंबा असल्याचे राजेंद्र यांनी सांगितले आहे.

अध्यक्षपदाबरोबर राज्यस्थानचे मुख्यमंत्री पदही आपल्याकडेच असावे अशी धारणा गेहलोत यांची होती. मात्र, एक पद-एक व्यक्ती हेच कॉंग्रेसचे सुत्र असल्याने गेहलोत यांनी जर अध्यक्षपदाची निवडणूक लढवली तर त्यांना राज्यस्थानच्या मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे.

राज्यस्थान सरकारमध्ये गेहलोत यांना काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. मात्र, त्यामधीलच काही आमदार हे सचिन पायलट यांना पाठिंबा दर्शवतेल. त्यामुळे गेहलोत यांनी निवडणूक लढवली तर मात्र, सचिन पायलट हेच राज्यस्थानचे मुख्यमंत्री असेच सध्याचे चित्र आहे.

कॉंग्रेसने एक व्यक्ती, एक पद असा नारा दिला आहे. त्यामुळे गेहलोत यांना कोणत्यातरी एकाच पदावर रहावे लागणार आहे. त्यांचा कल मुख्यमंत्री पदाकडे असला तरी त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूर लढावी अशी अपेक्षा हायकमांडची असल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें