Congress : गहलोत, शशी थरुर सोडा आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘हे’ नाव आहे चर्चेत..!

कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडीची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. रोज नवा ट्विस्ट समोर येत आहे. या पदाच्या निवडीवरुन राजस्थानच्या राजकारणात उलथापालथ होते की काय अशी स्थिती आहे. यातच आता नवे नाव समोर येत आहे.

Congress : गहलोत, शशी थरुर सोडा आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये 'हे' नाव आहे चर्चेत..!
सोनिया गांधी
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 4:22 PM

मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडीवरुन राजस्थानचे राजकारण (Rajasthan Politics) तापले, असे असतानाच आता अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये नवेच नाव चर्चेत आले आहे. आतापर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरुर यांची नावे चर्चेत होती. शिवाय अध्यक्षपदी गहलोत तर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद कुणाकडे यावरुन गदारोळ सुरु असतानाच आता दिग्विजय सिंह (Digvijay Singh) हे देखील अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. एवढेच नाहीतर निवडणुकासाठी ते लवकरच आपला अर्जही दाखल करणार आहेत.

पुढील महिन्यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुक होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस कुटुंबातील कोणीही सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच राहुल गांधी यांनी सांगितले होते. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरुर यांची नावे चर्चेत होती. पण आता या निवडणुकीत दिग्विजय सिंह देखील नशीब आजमावणार आहेत.

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीला घेऊन दिवसागणीस वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. आतापर्यंत दिग्विजय सिंह यांचे नाव चर्चेत नव्हते. पण ते देखील निवडणुक लढवणार आहेत. तर लवकरच आपला अर्जही दाखल करणार आहेत.

निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस पक्षाने काही नियमावली जारी केली असून त्यामध्ये एक व्यक्ती, एक पद असे सूत्र आहे. त्यामुळे अध्यक्ष असणाऱ्या व्यक्तिला इतर कोणत्याही पदावर राहता येणार नाही.

कॉंग्रेस पक्षाने नियमावली जारी केली असली तरी राजस्थानमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री असलेले अशोक गहलोत हे अध्यक्षपदासाठी फारसे इच्छूक नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदी कोण यामुळे अतंर्गत मतभेद हे चव्हाट्यावर आले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.