आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र
गोपीचंद पडळकर आणि आदित्य ठाकरे

मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट असून त्यासाठी महाविकासआघाडी जबाबदार आहे. | gopichand padalkar letter to CM Uddhav Thackeray

Rohit Dhamnaskar

|

May 09, 2021 | 12:28 PM

मुंबई: मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. (BJP leader gopichand padalkar letter to CM Uddhav Thackeray)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत.

“आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का ?” लसीकरणावरुन गोपीचंद पडळकर यांचा खोचक सवाल

मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट असून त्यासाठी महाविकासआघाडी जबाबदार आहे. पण उर्वरित समाजाचं काय? मराठा समाजाबरोबरच इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचं काय करायचं? इतर सर्व मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील 365युवकांना अजून नियुक्ती नाही. यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच पाप ठरेल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

सदर नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी पत्रात केली आहे.

मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या; छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपती संभाजीराजे यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली होती.

महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे २१८५ मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. प्रथमतः कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ताळेबंदी व नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती, या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारांस सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्र देण्यास विलंब झाला.

सध्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे ; त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत, त्याच पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे, असे संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या :

Maratha Reservation Live | मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस : खासदार संभाजीराजे

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, राष्ट्रपती, पंतप्रधानांना हातजोडून विनंती; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार’, भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत सविस्तर चर्चा

(BJP leader gopichand padalkar letter to CM Uddhav Thackeray)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें