बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी सरकार स्थापन होणार का? शरद पवार म्हणतात...

येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनादिवशी सरकार स्थापन होणे अशक्य असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (sharad pawar statement on government formation) सांगितले.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी सरकार स्थापन होणार का? शरद पवार म्हणतात...

नागपूर : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (sharad pawar statement on government formation) झालं आहे. पण सत्तास्थापनेसाठी वेळ लागणार असून येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी सरकार स्थापन होणे अशक्य असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (sharad pawar statement on government formation) केले.

शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.  यावेळी शरद पवार यांना एका व्यक्तीने 17 नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन होणार का? असे विचारले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, “सत्तास्थापनेसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे 17 तारखेपूर्वी सत्तास्थापन होणे अशक्य आहे,” असे वक्तव्य अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी (sharad pawar statement on government formation) स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात सहभागी झाल्यावर त्यांनी राऊत यांच्या घरी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख उपस्थित होते. यावेळी राजकीय चर्चा झाली नसली तरी काँगेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांमधील संबंध आणखी दृढ करण्याच्या अनुषंगानं महत्वाची होती.

शरद पवार यांच्या या विधानाने शिवसैनिकांमध्ये मात्र नाराजीचे सूर उमटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 17 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या दिवशी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यावी अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. मात्र शिवसैनिकांची ही इच्छा पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात तीन दिवस चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सलग तीन दिवस म्हणजे 17,18, 19 नोव्हेंबरला दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक महासेना आघाडीबाबत चर्चेसाठी बोलवण्यात आली आहे. यात 17 नोव्हेंबरला चहापानावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार (sharad pawar statement on government formation) आहे.

या बैठकीला काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील सत्तासमीकरणावर तोडगा काढण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *