Bhagatsingh Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा बीड दौरा, अंबाजोगाईची योगेश्वरी, परळी वैद्यनाथाचं दर्शन

| Updated on: Aug 19, 2022 | 5:51 PM

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यासाठी अंबाजोगाई येथे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले.

Bhagatsingh Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा बीड दौरा, अंबाजोगाईची योगेश्वरी, परळी वैद्यनाथाचं दर्शन
अंबाजोगाई येथील योगेश्वरीचे दर्शन घेताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी आज बीड दौऱ्यावर असताना अंबाजोगाई (Ambajogai) येथील योगेश्वरी देवी तसेच परळी येथील वैद्यनाथाचं (Parali Vaidyanath) दर्शन घतेलं. दोन्ही मंदिरात राज्यपालांचं यथायोग्य स्वागत करण्यात आलं. अंबाजोगाई येथील मंदिर व्यवस्थापन समितीकडून तसेच बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व ट्रस्टी यांच्या हस्ते राज्यपाल महोदयांना योगेश्वरी देवीचा फोटो तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी यावेळी विधीवत देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिरात देवीची आरती केली. यावेळी अंबाजोगाई येथील स्थानिक प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी परळी येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचेही दर्शन घेतले. अंबाजोगाई आणि परळी येथे दर्शनाला येण्याची कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती, ती आज पूर्ण झाल्याची भावना राज्यपालांनी याप्रसंगी व्यक्त केली.

राज्यपाल भगसिंग कोश्यारी

योगेश्वरी मंदिराला भेट

कोकण वासियांची कुलस्वामिनी असलेली आंबेजोगाई ची माता योगेश्वरी देवीचे दर्शन आज राज्यपाल भगतसिंग कोषयारी यांनी घेतले.. कोश्यारी हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे दर्शन घेतलं. मागच्या अनेक दिवसापासून देवीच्या दर्शनाला यायचं ठरलं होतं आणि आज मी आलो या यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठीतून मी खूप कौतुक करतो…असं म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या…

परळी वैद्यनाथाचे दर्शन घेताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

प्रभू वैजनाथाचे दर्शन

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दर्शन घेतलं.. यावेळी कोश्यारी यांनी विधीवत पूजा करून वैद्यनाथाला दुग्धाभिषेक केला.. कोषारी यांचा आजचा मुक्काम परळी शहरामध्ये असणार आहे…

हे सुद्धा वाचा

परळी वैद्यनाथाचा अभिषेक करताना राज्यपाल

माजी सैनिकांसाठीचे काम कौतुकास्पद

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यासाठी अंबाजोगाई येथे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांना पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आले त्यानंतर बैठकीच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून हे काम कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरात विविध नवीन संकल्पनातून योजनांबद्ध अंमलबजावणी केली जात आहे असंही ते म्हणाले.. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी माजी सैनिकांच्या साठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे सद्यस्थितीत गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही परंतु माजी सैनिकांना शासकीय व इतर क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिले जात आहेत असे सांगितले. जिल्हा सैनिक कार्यालयाचे संजय देशपांडे यांनी यावेळी माहिती सादर केली.

आरोग्य स्थितीचा आढावा

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी  पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती दिली. ग्रामीण भागात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय , लोखंडी सावरगाव येथील भव्य 1000 घाटांचे रुग्णालय आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून बीड तसेच शेजारील जिल्ह्यातील जनतेला देखील आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे.