राज्यपालांनी आघाडीला बोलवावं, देवरांचे ट्विट ; शिवसेनेसोबत जाणं आत्मघातकी, संजय निरुपम यांचा टोला

मिलिंद देवरा यांच्या ट्विटनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र विरोधाभासी ट्विट केले (Milind Deora And Sanjay Nirupam Tweet) आहे.

राज्यपालांनी आघाडीला बोलवावं, देवरांचे ट्विट ; शिवसेनेसोबत जाणं आत्मघातकी, संजय निरुपम यांचा टोला

मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून भाजप शिवसेनेच्या सत्तासंघर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने आता उडी (Milind Deora And Sanjay Nirupam Tweet) घेतली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक ट्विट (Milind Deora And Sanjay Nirupam Tweet) केलं आहे. या ट्विटमध्ये “जर शिवसेना भाजप सत्तास्थापनेसाठी नकार देत असतील, तर राज्यपालांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावं,” असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. मिलिंद देवरा यांच्या ट्विटनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र विरोधाभासी ट्विट केले (Milind Deora And Sanjay Nirupam Tweet) आहे.


“राज्यातील राजकारणातील सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीला सरकार बनवणे अशक्य आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्हाला शिवसेनेची युती करणे गरजेचे आहे. आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत भागीदार होण्याचा विचार कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत करु शकत नाही. तसेच ही राजकीय खेळी पक्षासाठी आत्मघातकी ठरु शकते, असे ट्विट संजय निरुपम यांनी केले आहे.”

मिलिंद देवरा यांच्या ट्विटच्या काही वेळापूर्वी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा सुरु झाली आहे. जयपूरमधील काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला शिवसेना सरकार स्थापन करणार की भाजपला पाठिंबा देऊन महायुतीचंच सरकार येणार, हे पाहणं आता महत्त्वाचे (Milind Deora And Sanjay Nirupam Tweet)  ठरणार आहे.

राष्ट्रवादीही सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु नंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘सिल्व्हर ओक’मध्ये वाढलेल्या फेऱ्यांमुळे सेना-राष्ट्रवादी सूत जुळण्याची चिन्हं पुन्हा निर्माण झाली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र भाजपने असं आश्वासनच दिलं नसल्याचं म्हटल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन करण्याची संधी शिवसेनेला मिळाली, तर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार (Congress may Support Shivsena), याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

काँग्रेसने पाठिंबा दिल्यास…. (Congress may Support Shivsena)

शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162
बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168
बहुमताचा आकडा – 145

संबंधित बातम्या : 

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या 99 टक्के आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा?

सत्तासंघर्षात ट्विस्ट, शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसकडून हिरवा कंदिल?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *