Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे, जयश्री पाटीलही सहआरोपी; सरकारी वकिलांनी काय सांगितलं?

| Updated on: Apr 13, 2022 | 8:12 PM

सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. इतकंच नाही तर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे, जयश्री पाटीलही सहआरोपी; सरकारी वकिलांनी काय सांगितलं?
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा राडा केला होता. 8 एप्रिल रोजी झालेल्या राड्याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना कोर्टात हजर केलं असता सुरुवातील दोन आणि नंतर दोन असे चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. इतकंच नाही तर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

सरकारी वकिलांनी काय सांगितलं?

सरकारी वरील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार आज गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. इतर दोन आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे. सातारा पोलीस त्यांना आर्थर रोड कारागृहातून घेऊन जातील. मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर जयश्री पाटील यांना सहआरोपी केलंय. कट रचणे, आरोपींना प्रोत्साहन देण्याचा जयश्री पाटील यांच्यावर आरोप असल्याचं प्रदीप घरत यांनी सांगितलं.

सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे का?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल असं वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मागितला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा आता सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय.

कोर्टात काय झालं?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. तर पोलीस कोठडीची आता काहीही गरज नसल्याचा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला. गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही आता आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे, असे म्हणत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. खासकरून एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली गेली, असा आरोप करण्यात आलाय. तसेच ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचा मोठा सहभाग असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाला संगितले आहे.

इतर बातम्या :

Nawab Malik ED Property Seized :कुर्ल्यापासून ते उस्मानाबादपर्यंत नवाब मलिकांचं संस्थान खालसा; दाऊदच्या बहिणीचा रोल काय?

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; सातारा पोलीस ताब्यात घेणार?