जेव्हा हरिभाऊ बागडेंना थेट मोदींचा फोन आला, खास किस्सा आहे तरी काय?

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी एक किस्सा सांगितला आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉल केला होता.

जेव्हा हरिभाऊ बागडेंना थेट मोदींचा फोन आला, खास किस्सा आहे तरी काय?
narendra modi and haribhau bagade
| Updated on: Jul 13, 2025 | 8:35 PM

भंडारा जिल्हातील साकोली विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाषण करत हेमकृष्ण कागपते यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक खास किस्सा सांगितले. मोदी यांनी केलेल्या एका फोन कॉलबद्दल बागडे यांनी यावेळी सांगितले.

मला एका प्राव्हेट नंबरवरून फोन आला

मी आपल्या मतदाहसंघातून दोन तीनदा आमदार झालो होतो. त्यामुळे माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही असे मी आमच्या वरिष्ठाना सांगितले होते. काही दिवसानंतर अचानक सकाळच्या वेळी 27 जुलै रोजी मला एका प्राव्हेट नंबरवरून फोन आला. तिकडून मी पंतप्रधानांच्या कार्यालयातून बोलत असून मोदीजी तुमच्याशी बोलत आहेत अस सांगितलं. मला वाटलं की कुणी तरी आपल्याला बनवत आहे, अशी आठवण बागडे यांनी सांगितली.

मोदींनी सांगितलं बाहेर कोणालाही सांगू नका

तसेच, पुडे बोलताना समोरून माझ्याशी चक्क मोदीजीच बोलत होते. तुम्हाला आता बाहेर जाऊन काम करायचं आहे. तुम्हाला राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम सांभाळायचं आहे, असं मला मोदींनी सांगितलं. तसेच हे बाहेर कुणाला सांगू नका, असंही त्यांनी मला सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी दोन वाजेदरम्यान कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितले की माझी निवड राजस्थानचे राज्यपाल म्हणून झाली आहे. हे एकून मी पण म्हटलं मला आता झोपू द्या. कारण आम्हाला उद्या काय काम सांगतील काही सांगता येत नाही, असा मोदींच्या फोन कॉलचा किस्सा बागडे यांनी यावेळी सांगितला.

हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रकाशन

दरम्यान, हा कार्यक्रम सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांचा सत्कार पडला. यावेळी त्यांच्या पुस्तकाचे राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रकाशनही कारण्यात आले. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.