“एक मच्छर भी आदमी को…”, चित्रपटाच्या डायलॉगमधून हेमंत गोडसे यांचा संजय राऊतांवर निशाणा
चित्रपटाच्या डायलॉगमधून हेमंत गोडसे यांचा संजय राऊतांवर निशाणा...

नाशिक : खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या यशवंत सिनेमातील डायलॉगच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, असं म्हणत गोडसे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.
आम्ही तर छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. त्यांना सांगा मच्छर चावल्यावर डेंग्यू होतो, प्लेटलेट्स कमी होतात. एखादा मच्छर काय करू शकतो हे माहित आहे . आम्ही तर मावळे आहोत, असं गोडसे म्हणालेत.
जनतेला माहित आहे की, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम कोण करत आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी जे पाऊल उचललं. त्यासोबत 40 आमदार, 12 खासदार आणि नाशिक महापालिकेतील 12 माजी नगरसेवक सहभागी झाले आहेत. आमचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.
मागच्या काही दिवसापासून शिंदेगटात येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्या सेनेत येणाऱ्यांची संख्या वाढतच जाईल, असंही गोडसे म्हणालेत.
अजून बरेच लोक आमच्या गटात सहभागी होत आहेत. कारवा अभी बढते जा रहा है! आगामी महापालिकेत आमचाच महापौर होईल, असा विश्नास गोडसेंनी व्यक्त केलाय.
