IAS Probationer Pooja Khedkar : आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांच्यावर हिंदू महासंघाने काय आरोप केलेत?

IAS Probationer Pooja Khedkar : आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांचा विषय आता तापत चालला आहे. त्यांच्यासंबंधी नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. मूळात त्या IAS कशा झाल्या त्यावरुन वाद आहे. आता बेहिशोबी मालमत्ता, आरक्षणावरुन त्यांच्यावर आरोप झाले आहेत.

IAS Probationer Pooja Khedkar : आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांच्यावर हिंदू महासंघाने काय आरोप केलेत?
IAS Probationer Pooja Khedkar
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:22 AM

आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर कोण आहेत? याची चर्चा आता राज्यात सुरु झाली आहे. मूळात त्या IAS कशा झाल्या त्यावरुन वाद आहे. आता हळूहळू त्यांच्या नियुक्तीवरुन राजकारण रंगायला लागलं आहे. आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पूजा खेडकर यांच्यावर आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांच्या समाजातील गरजूवर अन्याय झाला आहे असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “पूजा खेडकर यांचे वडील, आजोबा सशक्त आहेत, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये ऑडी सारखी गाडी घेऊन जाता. यामुळे हे सिद्ध होतं की, तुम्ही आरक्षणाचा गैरफायदा घेत आहात आणि सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो” असं आनंद दवे यांनी म्हटलय.

“खुल्या गटातील लोकांवर कायमच अन्याय होतो. सध्या नव्याने जे IAS उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची कागदपत्र शासनाने तपासून घेतली आहेत का?” असा आनंद दवे यांनी सरकारला सवाल विचारला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. डॉ. पूजा खेडकर यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

बेहिशोबी मालमत्ता काय?

पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. 1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. 7 फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे. 4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.