Hindu Vs Hindutva| निवडणुकीच्या मैदानात कोण चालणार, काँग्रेस टक्कर देणार की भाजपच्या जाळ्यात अडकणार…?

पाच राज्यांतील विधानसभेच्या तोंडावर राहुल सॉफ्ट हिंदुत्वावर स्वार होऊ पाहतायत. मात्र, ते वाराणसीमधल्या गंगेत डुबकी मारणाऱ्या मोदींच्या भाजपचा मुकाबला खरोखरच या मुद्यावर करू शकतील का?

Hindu Vs Hindutva| निवडणुकीच्या मैदानात कोण चालणार, काँग्रेस टक्कर देणार की भाजपच्या जाळ्यात अडकणार...?
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी.
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 5:56 PM

नवी दिल्लीः 12 डिसेंबर रोजी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वक्तव्य केले. देशात 2014 पासून हिंदूंचे नाही, तर हिंदुत्तवाद्यांचे राज्य आहे. आता आपल्याला पुन्हा एकदा हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढून हिंदूंचे राज्य आणायचे आहे. त्यांनी जयपूरमध्ये केलेल्या या विधानाची भरपूर चर्चा झाली. पाच राज्यांतील विधानसभेच्या तोंडावर राहुल सॉफ्ट हिंदुत्वावर स्वार होऊ पाहतायत. मात्र, ते वाराणसीमधल्या गंगेत डुबकी मारणाऱ्या मोदींच्या भाजपचा मुकाबला खरोखरच या मुद्यावर करू शकतील का?

हिंदू कोण आहे?

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणालेले, हिंदू कोण आहे? जो सर्वांची गळाभेट घेतो. हिंदू कोण आहे? जो कुणालाही भीत नाही. हिंदू कोण आहे? जो प्रत्येक धर्माचा आदर करतो. तो हिंदू आहे. ते पुढे असेही म्हणाले की, तुम्ही आपले शास्त्र, रामायण, महाभारत वाचा. गीता आणि उपनिषदांचा अभ्यास करा. मला दाखवा गरिबाला मारा, असे कुठे सांगितले आहे ते. राहुल यांच्या या भाषणाचे सोनियांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.

राहुल यांचा काय प्रयत्न?

काँग्रेसवर नेहमी तुष्टीकरणाचा आरोप केला जातो. या आरोपातून वाचण्यासाठी राहुल यांनी हा पवित्रा घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ते एकीकडे सॉफ्ट हिंदुत्वाचा राग आळवतायत. दुसरीकडे भाजपला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून हिंदूच्या मूळ भावनेपासून वेगळे करू पाहतायत. भाजपला विरोध करणारे पक्षही वारंवार याचाच आधार घेतात. मात्र, सामान्यांच्या गळी हा मुद्दा कितपत उतरेल, हे येणारा काळच सांगेल.

गोडसे, भाजप आणि काँग्रेस

जयपूरच्या सभेमध्ये राहुल म्हणाले की, ते हिंदू आहेत. मात्र, हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी त्यासाठी महात्मा गांधींचे उदाहरण दिले. महात्मा गांधी हिंदू होते. तर गोडसे हिंदुत्ववादी. राहुल यांचा हा प्रयत्न आहे की, त्यांनी भाजपला हिंदुत्ववादी म्हणत थेट गोडसेशी जोडले. यामुळे भाजपच्या मतावर परिणाम होईल, अशी शक्यता त्यांना वाटते. खरे तर भाजपच्या स्थापनेतही हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा होता. धर्म आणि संस्कृती आजही भाजपचा मुख्य अजेंडा आहेच. अयोध्येचे राम मंदिर आंदोलन असो की, केदारनाथ धाम. काशी विश्वनाथ मंदिराची भव्य निर्मिती. भाजपने हिंदुत्व अशा पद्धतीने पुढे रेटले आहे.

प्रशांत किशोरांचे निरीक्षण काय?

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अनेकदा काँग्रेसला आरसा दाखवला. त्यांनी नुकतेच एक ट्वीट केले. त्यात ते म्हणालेले, पत्रकार परिषद घेऊन भाजपला हरवले जाऊ सकत नाही. भाजप अनेक दशके राहील. प्रशांत किशोर यांच्या नजरेत, समाजाला जवळून ओळखणारे, राजकीय संघटना आणि सरकार चालवण्याचा इतका अनुभव असलेले मोदींसारखे देशात दुसरे व्यक्तिमत्व नाही. मोदी जनतेला काय हवे आहे, याचा योग्य अंदाज अगोदर बांधतात. त्यामुळेच जनता त्यांच्या निर्णयाचा उदो-उदो करते.

कोण कुणाच्या जाळ्यात?

हिंदुत्वाच्या मुद्यावरून मोदी प्रत्येक घटनेचा इव्हेंट करतात. त्यात आजचेच उदाहरण घ्या. मोदी यांनी काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…असे म्हणत भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली. आपल्या देशासाठी स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी सततचे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तिसऱ्या संकल्पाची आत्ताच सुरुवात करावी लागेल. हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा मोठा सोहळा होईल. त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी आत्तापासून काम करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. आता काँग्रेसचा कोणताच नेता मंदिरात जाताना दिसत नाही. मात्र, राहुले इथे भाजपच्या रस्त्यावर जात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काँग्रेस धर्माधारित राजकारण करतना भाजपच्या जाळ्यात तर अडकणार नाही ना? कारण भाजपला स्वतःची ताकद आणि काँग्रेसची कमजोरी याची पुरेपुर जाण आहे. मात्र, होणार काय ते काळच सांगेल.

 इतर बातम्याः

Kashi Vishwanath Corridor: हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है; ज्या भाषेतून मोदी बोलले ती बोली माहीत आहे का?

Kashi Vishwanath Corridor| पंतप्रधान मोदींचे काशी विश्वनाथाच्या साक्षीने तीन संकल्प; देशासाठी जनता जनार्दनाला साकडे!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.