Viral Audio clip : काय झाडी…काय डोंगार…! राज्यात धूमाकूळ घालणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तरी कशी? वाचा सविस्तर

रफीक पठाण हा केवळ शहाजी बापू पाटील यांचा कार्यकर्ताच नाहीतर बापूमुळेच त्याने आतापर्यंत नगरसेवक, नगराध्यक्ष पदेही मिळवली आहेत. शिवाय गेल्या अनेक वर्षापासून तो त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. असे असले तरी याबाबत त्याने स्पष्टीकरण दिले आहे की, आपल्याला ही क्लिप काढायची कशी आणि व्हायरल करयाची कशी हेच माहिती नाही.

Viral Audio clip : काय झाडी...काय डोंगार...! राज्यात धूमाकूळ घालणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तरी कशी? वाचा सविस्तर
आ. शहाजी पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला संवाद प्रचंड व्हायरल होत आहे.
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 4:00 PM

मुंबई : आता नुसतं काय झाडी…एवढा उल्लेख झाला तरी पुढेच वाक्य काय असणार हे सर्वांना माहिती झाली आहे. (Social Media) सोशल मिडियाच्या माध्यमातून एखादी बाब किती व्हायरल होऊ शकते ते सांगोल्याचे आमदार (Shahaji Patil) शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या संवादाच्या ऑडिओ क्लिपने लक्षात आले आहे. आज सबंध राज्यभर या क्लिपने धूमाकूळन घातला आहे. मात्र, ही (Viral Audio Clip) क्लिप व्हायरल झालीच कशी असा सवाल आता दोन दिवसांनतर पडू लागला आहे. का आ. शहाजी बापू पाटलांनीच ही क्लिप व्हायरल केली का अशी शंका देखील उपस्थित होत आहे. कारण ज्या कार्यकर्त्याशी शहाजी पाटलांनी संवाद साधला आहे त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे कार्यकर्ता असलेल्या रफीक नदाफने ही क्लिप व्हायरल केली की खुद्द शहाजी पाटलांनीच. रफीकच्या स्पष्टीकरणानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

काय आहे रफीक नदाफचे स्पष्टीकरण?

रफीक पठाण हा केवळ शहाजी बापू पाटील यांचा कार्यकर्ताच नाहीतर बापूमुळेच त्याने आतापर्यंत नगरसेवक, नगराध्यक्ष पदेही मिळवली आहेत. शिवाय गेल्या अनेक वर्षापासून तो त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. असे असले तरी याबाबत त्याने स्पष्टीकरण दिले आहे की, आपल्याला ही क्लिप काढायची कशी आणि व्हायरल करयाची कशी हेच माहिती नाही. एवढेच नाही तर आपल्या मोबाईलला कॉल रेकॉंर्डिंगही होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लिप रफीक ने तर व्हायरल केली नाही असे त्याच्या सांगण्यावरुन लक्षात येत आहे. मग उरला प्रश्न क्लिप व्हायरल केली कोणी? कारण ज्या पध्दतीने क्लिप सोशल मिडियावर व्हायरल होत आहे त्यानुसार यामागे कोण असेल असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.

मग क्लिप व्हायरल केली कोणी?

ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी शहाजी पाटील यांच्या कार्यकर्त्याने तर हात वरी केले आहेत. मग प्रश्न उरतो तो ही क्लिप शहाजी बापू पाटील याच्याच मोबाईमध्ये असल्याचा. या दोघांपैकी एकानेच ही क्लिप व्हायरल केली हे त्रिकालबाधीत सत्य असले तरी अद्याप कोणी केली याबाबत अधिकृत सांगता येत नाही. मात्र, माजी. आ. गणपतराव देशमुख यांच्याबाबतीत केलेला उल्लेख आणि मतदार संघात काय स्थिती हे जाणून घेण्याची आत्मियता या क्लिपच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्ता आणि शहाजी पाटलांमध्ये काय संवाद?

आपल्या फोनमध्ये रेकॉर्डिंगची सोय नसल्याचे सांगत रफीक यांनी हे ही स्पष्ट केले की, या फोन नंतर पुन्हा शहाजी बापूंनी फोन करुन एवढेही सांगितले की, यामधले कोणाला काही सांगायचे नाही. त्यामुळे आपण झालेल्या संवादाबद्दल कुणाजवळच काही बोललो नाही. तर क्लिप व्हायरल झाल्यावरच मलाही हे समजल्याचे रफीक नदाफ यांनी स्पष्ट केले आहे. रफीक नदाफ हे सांगोला नगरपरिषदेचे 3 वेळा नगरसेवक राहिले आहेत तर अडीच वर्षे त्यांनी नगराध्यक्ष पदही भूषविले आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.