मी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

"मी कोणत्याही एका पक्षाचा मुख्यमंत्री नाही. तर मी भाजपसह शिवसेना आणि इतर मित्रपक्षांचाही मुख्यमंत्रीही आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोरेगावच्या मेळाव्यात केले.

मी भाजपसह शिवसेना आणि मित्रपक्षांचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

मुंबई : “मी कोणत्याही एका पक्षाचा मुख्यमंत्री नाही. तर मी भाजपसह शिवसेना आणि इतर मित्रपक्षांचाही मुख्यमंत्रीही आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadanvis) गोरेगावच्या विशेष कार्यसमिती बैठकीत केले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज गोरेगावमध्ये भाजपची विशेष कार्यसमिती बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री कोणाचा या वादात पडू नये, भविष्यातील मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

“येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीतच लढणार आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका ठेवू नये. तसेच विधानसभेत कोणाला कोणत्या जागा असणार याचा निर्णयही लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis)  यांनी सांगितले.”

जो माणूस साधा मंत्री नव्हता त्याला तुम्ही संधी दिलात. त्या संधीमुळे मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने सर्वाचे आभार मानले.

“गेल्या सरकारमधील अनेक प्रश्न आम्ही सत्तेच येऊन सोडवले. मी मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलन झाली. त्या प्रत्येकाची दखल घेतली. त्यामुळे आम्ही करुन दाखवलं याचा मला अभिमान आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.”

दरम्यान लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला म्हणून पुन्हा मोठं यश मिळेल असे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांना पुढाकार घ्यायचा आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

“महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. त्यामुळे ईश्वराला प्रार्थना आहे की चांगला पाऊस पडावा. येत्या काळात पाण्याचे नियोजन करुन दुष्काळावर मात करायची आहे. तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळामुक्तीकडे आपली वाटचाल सुरु आहे. दरम्यान या पिढीन दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पहावा लागणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.”

येत्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक हाताला काम द्यायच आहे. तसेच स्वच्छतेच्या माध्यमातून नवीन महाराष्ट्र उभा करायचाय. शिक्षणात 17 व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला युतीच्या सरकारने 3 ऱ्या क्रमांकावर आणला. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक तरतुद महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

तसेच भाजप ही पब्लिक अन लिमिटेड पार्टी आहे. पण जे येत आहेत, त्यांना तपासूनच पक्षात घेऊ. अजून नवीन लोक पक्षात येत आहेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. तसेच 85 टक्के लोक हे आपल्या पक्षात काम करणारे असतात. तर 15 टक्के लोक हे बाहेरुन घेतलेले असतात असेही त्यांनी यावेळी म्हटले.

तसेच बाहेरील लोक आले म्हणून कार्यकर्त्यांनी उगाच त्रागा करू नये, या निवडणुकीत 220 पार चा नारा दिला आहे. आपल्याला प्रत्येक सिट जिंकण्यासाठी लढायची आहे. सर्व्हे करुनच निवडणुकीच तिकीट वाटप केल जात. कोणाला तिकीट द्यायच हे पक्षाला चांगला माहिती आहे. त्यामुळे पक्षात निवेदन देऊन कोणाला तिकीट मिळत नाही. नारा देऊन, कोणाला पुढे करुन तिकीट मिळत नाही असा टोलाही त्यांनी पक्षातील नेत्यांना  लगावला. कोणाला तिकीट द्यायचं आहे हे पक्षाला माहीत आहे. जे मुंबईला निवेदन घेऊन येतील त्यांचा 1 मार्क तिथेच कट होईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, कुठल्याही जवळच्या माणसाला तिकीट मिळणार नाही. जो योग्य त्यालाच तिकीट देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना खडसावले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *