पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोदी बागेत राहतात याची मला कल्पना नाही. मी माझ्या खासगी कामनिमित्त त्या ठिकाणी गेलो (Jaykumar gore meet sharad pawar) होतो. मी कुटुंबासोबत होतो. त्यामुळे पवारांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” अशी प्रतिक्रिया भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी (Jaykumar gore meet sharad pawar) दिली. जयकुमार गोरे यांनी नुकतंच शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र मी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केलं (Jaykumar gore meet sharad pawar) आहे.