मला एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस : एकनाथ खडसे

"मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच", असा हल्लाबोल एकनाथ खडसे यांनी केला.(Eknath Khadse vs Devendra Fadnavis)

मला एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस : एकनाथ खडसे

जळगाव : “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा हल्लाबोल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सलग तिसऱ्या दिवशी केला. एकनाथ खडसे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल सुरु केला आहे. खडसे-फडणवीसांनी घरच्या धुण्या-भांड्यापासून ते ड्रायक्लीनरपर्यंतचे शब्दप्रयोग वापरुन झाले आहेत. त्यानंतर आज खडसेंनी पुन्हा एकदा घणाघात केला.

जे काही कटकारस्थान रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनीच रचले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काय काय उद्योग केले ते मला माहिती आहेत. मी पक्षाच्या विरोधात भाषा केली नाही. मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच, असं एकनाथ खडसे म्हणाले.

माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती ,ते या बारभाई कारस्थानतूनच झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार आहे, असं एकनाथ खडेस म्हणाले.

संबंधित बातम्या 

Eknath Khadse | देवेंद्रजी उत्तम ड्रायक्लीनर, खडसेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर   

Eknath Khadse | माझ्यावरील आरोपांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हात : एकनाथ खडसे 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI