टीका झाली तरी चालेल, पण खोटा धीर देणार नाही : मुख्यमंत्री

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी "राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात" ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

टीका झाली तरी चालेल, पण खोटा धीर देणार नाही : मुख्यमंत्री
CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 2:38 PM

मुंबई : “पावसाची सुरुवात आपल्याकडे चक्रीवादळाने होते. प्रत्येकवेळी पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते ? तात्काळ मदत करावी लागते. मी खोटं बोलणार नाही. लोकांना धीर देताना उगीच काहीही बोलायचं नसतं. माझ्यावर टीका झाली तरी चालेल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही सभागृहात जे बोलता ते केलं नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचं भान असलं पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आलं पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी “राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

काल शाळेची घंटा, आज आपला वर्ग भरला

मुख्यमंत्री म्हणाले, “काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उप सभापती यांनी थोडं गुरुजीसारखं वागावं लागेल. मी विधान परिषदेचा, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य. अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी! हे ठिपके म्हणजे राज्यातील मतदार संघ. हे मतदार संघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होईल त्यात विकासाचे रंग भरण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यातून राज्य विकासाची सुंदर रांगोळी रंगणार आहे”

आता या ठिकाणी आजी माजी.. माजी सदस्य नाहीत अजून. अर्थसंकल्पात साधू संत यांचे दाखले द्यायचे आणि शेरो शायरी करायची हे बरोबर नाही. एखादा विषय मांडला, भूमिका मांडली तर मत व्यक्त केलं पाहिजे. तुमच्या वागणुकीकडे लोकांचं लक्ष असतं. एखाद्या विषयावरून सभेत गोंधळघालायचा, आरडाओरडा करायची हे योग्य नाही, या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोललो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जगात कुठेही नसेल तेवढी आरोग्य सुविधा आपण गेल्या दीड वर्षात वाढवली आहे. याचा आकडा समोर आला पाहिजे. इतर गोष्टींचा निधी आरोग्य सुविधांकडे वळवावे लागले, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

दीड वर्षातील पहिला प्रशिक्षण कार्यक्रम

काल च राज्यातील शाळांची घंटा वाजली आज आपली शाळा विधानमंडळात भरली याचा आनंद. आपण आज ही विद्यार्थी!

अतिशय महत्वाच्या विषयावर वि. स. पागे प्रशिक्षण केंद्राने कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन

मी विधान परिषदेचा आमदार त्यामुळे सम्पूर्ण राज्य माझा मतदार संघ. त्यामुळे मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागेल

अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी! हे ठिपके म्हणजे राज्यातील मतदार संघ. हे मतदार संघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होईल त्यात विकासाचे रंग भरण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यातून राज्य विकासाची सुंदर रांगोळी रंगणार आहे.

अर्थसंकल्पात कविता शेरो शायरी आलीच पाहिजे का, आली तरी हरकत नाही परंतु त्यापेक्षा महत्वाचे अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमके बोलणे. हे काम अधिक कठीण आहे

अर्थसंकल्पात जाहीर केलेली धोरणे, योजना विकासकामे यातुन माझ्या मतदारसंघासाठी काय मिळवता येईल हे पाहणे, ते मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम प्रत्येक आमदारांनी केले पाहिजे

मी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत आलो तेंव्हा मला सभागृहाचे दोन भाग दिसले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष. हे दोन भाग सतत सोबत असतात असं नाही.  पण महाराष्ट्रातील मतदार विधानसभेच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात, मी ज्या आमदाराला मतदान केलं तो माझा लोकप्रतिनिधी माझे किती प्रश्न, माझ्या किती अडचणी विधान सभेत किती मांडतो याकडे त्यांचे लक्ष असते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे. माझ्या आयुष्यात कोणते बदल यातून घडतात, कोणते निर्णय येथे होतात हे ही मतदार पाहत असतो.

सभागृहात कुठल्या पातळीवर जाऊन हमरातुमरी करायची हे ही पाहायला हवे. यातून राज्याची शोभा होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवं.

महाराष्ट्राला थोर साधू संत आणि समाज सुधारकांची परंपरा, ही परंपरा जपणार हे सर्वोच्च सभागृह. ती परंपरा जपली पाहिजे

आजवर शिक्षण आरोग्याकडे खूप दुर्लक्ष. साथ नि आपत्ती आल्यानन्तर सर्वांची दाणादाण उडाली. पण मी ठामपणे सांगू शकतो की जगात कुठे ही नसतील इतक्या वेगाने नि संख्येने आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या.

कोरोनची तिसरी लाट येऊ नये ही प्रार्थना पण त्याला प्रयत्नांचे बळ हवे आहे.

तिसरी लाट येणार नसली तरी उभ्या केलेल्या आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज, त्या सुविधा योग्यप्रकारे चालू रहातील हे पाहणे महत्वाचे

आपले प्राधान्य जीव वाचवण्याला त्यामुळेच मागील दोन वर्षात आरोग्य क्षेत्राला अधिक निधी.

आपत्तीच्या प्रसंगात शासनाकडून वाढीव मदत. पण राज्य सतत आपत्तीच्या प्रसंगांना सामोरे जात आहे निसर्ग, तौक्ते गुलाब. एकापाठोपाठ एक संकट येत आहे. आता आलेले गुलाब वादळ पश्चिम किनाऱ्यावर धडकणार नाही असं म्हणत असताना राज्याला या गुलाबाचे काटे टोचले आणि अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले.

आपत्तीच्या या दरडी राज्यावर, राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर कोसळत आहेत त्यातून मार्ग काढत आपण पुढे जात आहोत

आपण प्रत्येक आपत्तीत तात्काळची मदत करतो आपण त्यांचे नुकसान कधीही भरून देऊ शकत नाही.

आपत्तीच्या प्रसंगात कोविड नियम पाळून मदत. लोकांचे स्थलांतर असेल जेवण निवाऱ्याची सोय असेल या सगळ्या गोष्टीकडे पहावं लागत.

आपत्तीत सर्वस्व हरवलेल्याना धीर देण्याचे काम करावे लागते. हे करताना खोटी आश्वासने देता कामा नये. मी हेच करतो, भले ही माझ्यावर टीका होत असेल मला त्याची पर्वा नाही

आज प्रगत यंत्रणा आपल्या हाताशी आहे, माध्यमे ही सगळ्या गोष्टी दाखवतात तरी आपत्तीग्रस्ताना धीर देण्यासाठी, आढावा घेऊन मदतीचा अंदाज घेण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज आहेच.

अर्थसंकल्पातील बाबी ठरवल्याप्रमाणे अमलात आणण्याची गरज

आमदार मतदार संघात अनेक घोषणा करतात त्या प्रत्यक्षात आणता आल्या नाही तर लोक घरी पाठवतात त्यामुळे ही शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मतदारसंघाला मिळवण्याचे प्रयत्न आवश्यक

विधानमंडळ सभागृहात बोलवयाच्या संसदीय भाषेच्या प्रशिक्षणाची ही गरज

अलीकडच्या काळात आलेला उथळपणा दूर करून विचारांची खोली आपण कधी अभ्यासणार की नाही? बोललेल्या प्रत्येक शब्दाला अर्थ असावा.

विधानमंडळात बोलण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्याची माती होणार नाही हे समजण्याची गरज

मराठवाड्यात ओला दुष्काल जाहीर करा : राजू शेट्टी

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची अद्याप घोषणा झालेली नाही. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात 11 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रोश परिषद आयोजित कऱण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या 

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, बीडमध्ये आक्रोश परिषदेद्वारे नुकसानाची दाहकता मांडणार: राजू शेट्टी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.