वंचितसोबत घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमचं स्वागत : रामदास आठवले

गेल्या निवडणुकीत एमआयएमला वंचितमुळे काहीही फायदा झाला नाही, उलट वंचितलाच एमआयएममुळे फायदा झाला होता, असंही रामदास आठवले (Ramdas Athavle on VBA) म्हणाले.

वंचितसोबत घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमचं स्वागत : रामदास आठवले

नागपूर : एमआयएमने सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचं आरपीएयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle on VBA) यांनी स्वागत केलंय. गेल्या निवडणुकीत एमआयएमला वंचितमुळे काहीही फायदा झाला नाही, उलट वंचितलाच एमआयएममुळे फायदा झाला होता, असंही रामदास आठवले (Ramdas Athavle on VBA) म्हणाले.

दरम्यान, वंचित आघाडीतून आणखी काही लोक बाहेर पडतील आणि आमच्याकडे येतील, असं भाकीतही आठवलेंनी केलंय. विरोधी पक्षनेता बनेल एवढी मतं वंचित आघाडीला मिळणार नाहीत. लोकसभेला मतं मिळाली असली तरी विधानसभेला वंचित आघाडीला फार मतं मिळणार नाहीत, असंही आठवले म्हणाले.

एमआयएम आणि वंचितचा काडीमोड

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून (Vanchit Bahujan Aghadi and AIMIM) वेगळा होण्याचा निर्णय घेतलाय. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान राखला नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं.

गेल्या दोन ते चार दिवसांपासूनच एमआयएमकडून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. वंचितकडून आठ जागांची ऑफर होती, तर एमआयएम 100 जागांसाठी आग्रही होती. त्यामुळे अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. विशेष म्हणजे या यादीत औरंगाबाद मध्य मतदारसंघाचाही समावेश नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *