तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…

नवी दिल्ली : देशात उद्या (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यांसाठी मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवण्यात आली आहे. तसेच सर्वांनी मतदान करावे यासाठी सरकारतर्फे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र निवडणुकी दरम्यान अनेकांचे मतदान ओळखपत्र नसल्याने मतदान करता येत नाही. यासाठी सरकारकडून आता नवीन उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. […]

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा...
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली : देशात उद्या (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यांसाठी मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवण्यात आली आहे. तसेच सर्वांनी मतदान करावे यासाठी सरकारतर्फे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र निवडणुकी दरम्यान अनेकांचे मतदान ओळखपत्र नसल्याने मतदान करता येत नाही. यासाठी सरकारकडून आता नवीन उपाययोजना सुरु करण्यात आली आहे.

आता मतदान करताना तुमच्याजवळ मतदान ओळखपत्र असणे गरजेचे नाही. या ऐवजी तुम्ही इतर सरकारी ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यक्रमपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्र तुम्ही मतदान करता वेळेस घेऊन जाऊ शकतात.

मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का हे पाहावे लागेल. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळेल. याबद्दल सरकारने काही सूचनाही दिल्या आहेत.

सूचना :

  • फोटो ओळखपत्रावर तुम्ही मतदान करु शकत नाही. यासाठी तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे.
  • मतदान केंद्रावर मतदान पावती ओळखपत्रासोबत वरील दिलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तसेच 6, 12 आणि 19 मे अशा 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें