‘केजरीवाल यांचा आप पक्ष म्हणजे भाजपची बी टीमच!’, नोटेवरच्या फोटोच्या मुद्द्यावरून जलील यांचा दावा

| Updated on: Oct 27, 2022 | 3:14 PM

खासदार इम्तियाज जलील यांनी केजरीवाल यांच्या आप पक्षाला भाजपची बी टीम म्हटलंय. वाचा...

केजरीवाल यांचा आप पक्ष म्हणजे भाजपची बी टीमच!, नोटेवरच्या फोटोच्या मुद्द्यावरून जलील यांचा दावा
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चलनातील नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याचं विधान केलं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. आपदेखील हिंदुत्वाच्या राजकारणात उतरल्याचं बोललं जात आहे. केजरीवाल यांच्या विधानावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी तर केजरीवाल यांच्या आप पक्षाला भाजपची बी टीम म्हटलंय.

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे आरएसएसने प्लांट केलेली भाजपची बी टीम आहे, असं जलील म्हणालेत.

जी मागणी केजरीवाल करत आहेत. यावरून त्यांच्या डोक्यात शेण भरल्याचं दिसतंय, अशा घणाघाती शब्दात जलील यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.

केजरीवाल हे सरडा आहेत. कधी ना कधी रंग बदलणारच हे आम्हाला आधीच ठावूक होतं, असं म्हणत केजरीवाल यांनी केजरीवाल यांच्यावर जहरी टीका केली आहे.

नरेंद्र मोदींचा ग्राफ खाली येईल. तेव्हा आपला दुसरा माणूस पाहिजे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना उभं केलं जात आहे, असंही जलील म्हणालेत.

गुजरात निवडणूका आणि दिल्ली निवडणूकीत जी मागणी त्यांनी केली आहे. ही हिंदुत्व आयडियॉलॉजी घेणार होते हे आम्हाला माहित होतं. आता कुठं गेलं रस्ता पाणी शिक्षण? हे आता त्यांनी हे सोडलं आहे. लोकांना भावनिक मुद्द्यांत अडकवण्याचा प्रयत्न आहे, असं जलील म्हणालेत.

देवी देवतांना मनात ठेवा. हा भारतीय जनता पक्षाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न हे सर्वसामान्य लोकांना समजत आहे. हिंदुत्वाच्या लढाईत सगळ्यांनी उडी घेतली आहे, असं म्हणत जलील यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय.