Narendra Modi : भाजप पराभूत होतच विजयी ठरली, पंतप्रधान मोदींनी सांगितला अनामत रकमेचा एक खास किस्सा

आम्ही प्रयत्न करत असतो की विजय आमच्या डोक्यात गेला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही जमिनीवर राहतो. आम्ही पराभवातही आशा शोधतो. निराशेच्या गर्तेत अडकून पडत नाही. आम्ही समोरच्यांची रणनिती समजून घेण्याचा आणि आमच्या चुकांचा अभ्यास करतो.

Narendra Modi : भाजप पराभूत होतच विजयी ठरली, पंतप्रधान मोदींनी सांगितला अनामत रकमेचा एक खास किस्सा
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 11:48 PM

नवी दिल्ली : देशात पाच राज्यांच्या निवडणुका (Five States Election) होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. उद्या (10 फेब्रुवारी रोजी) निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi)नी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी एका निवडणुकीतील खास किस्सा सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. भाजप निवडणूक पराभूत होत विजयी ठरली आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले. अनामत रक्कम जप्त झाली. एक वेळ असा होता की आमचे नेते मिठाई वाटत होते. तेव्हा मला वाटलं की हे तर पराभूत झाले आहेत आणि मिठाई का वाटत आहे. तर तेव्हा कळालं की आमच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम वाचली होती. असा काळ आम्ही पाहिला आहे, असे मोदींनी आपल्या मुलाखतीत सांगितले. (In an interview to ANI, Prime Minister Modi told the story of the old elections)

आम्ही प्रयत्न करत असतो की विजय आमच्या डोक्यात गेला नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही जमिनीवर राहतो. आम्ही पराभवातही आशा शोधतो. निराशेच्या गर्तेत अडकून पडत नाही. आम्ही समोरच्यांची रणनिती समजून घेण्याचा आणि आमच्या चुकांचा अभ्यास करतो. त्यानुसार आम्ही पुढील रणनिती ठरवतो. आमच्यासाठी निवडणूक ही एकप्रकारे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला आमच्या शिक्षणाचा भाग मानतो, असेही मोदींनी नमूद केले.

सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन काम करतो

निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. कारण निवडणूक आयोगाने काही मर्यादा आखून दिल्या. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत असतो. सरकारमध्ये असतो तेव्हा अधिक तीव्रतेनं, अधिक विस्ताराने, सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन काम करतो, असे मोदी म्हणाले.

भाजप मोठा विजय प्राप्त करेल

या निवडणुकीत सर्व राज्यात पाहतो आहे की भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेला आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारनं फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात तेव्हा अॅन्टी इन्क्मबन्सी येते. पण सरकारचा प्रयत्न दिसत असेल, योजनांची अंमलबजावणी दिसते तिथे सरकार विरोधी वातावरण दिसत नाही. भाजपशासित राज्यात प्रो इन्क्मबन्सी पाहायला मिळते, असेही मोदींनी सांगितले. (In an interview to ANI, Prime Minister Modi told the story of the old elections)

इतर बातम्या

‘भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी, उत्तर प्रदेशात विजय निश्चित’, पंतप्रधान मोदींचा दावा

Pm Modi : बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर मोदींच्या रुपात भाजप कार्यकर्त्याचा, मोदींचं मतदारांना आवाहन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.