‘भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी, उत्तर प्रदेशात विजय निश्चित’, पंतप्रधान मोदींचा दावा

युपीमध्ये उद्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. यावेळी बोलताना उत्तरप्रदेशमध्ये भाजापचा विजय निश्चत असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

'भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी, उत्तर प्रदेशात विजय निश्चित', पंतप्रधान मोदींचा दावा
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 8:49 PM

नवी दिल्ली : युमीमध्ये (up) उद्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान (elections) होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांनी आज संवाद साधला. यावेळी बोलताना उत्तरप्रदेशमध्ये भाजापचा विजय निश्चत असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना मोदींनी म्हटले आहे की, निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काही मर्यादा आखून दिल्या होत्या. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत असतो. सरकारमध्ये असतो तेव्हा अधिक तीव्रतेनं, अधिक विस्ताराने, सबका साथ , सबका विकास हा मूलमंत्र घेऊन काम करतो. आम्ही जनतेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देतो. सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भाजपशासित राज्यात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी नाही तर प्रो इन्क्मबन्सी दिसून येते.

भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरेल

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आमचे काम पहाता मला खात्री आहे की, पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्षा हा भाजपच ठरेल. भाजप मोठा विजय प्राप्त करेल. पाचही राज्यात भाजपाला सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या-ज्या राज्यांमध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली त्या, त्या राज्यातील जनेतेने आमची कामे पाहिली आहेत. आम्ही केवळ घोषणाच करत नाहीत तर ती कामे प्रत्यक्षात करतो देखील. भाजपाने जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या केवळ योजना सुरूच केल्या नाहीत तर त्याची यशस्वी अंमलबजावणी देखील केली.

विरोधकांवर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या देशात वेळ बदलली पण टर्मिनॉलॉजी नाही बदलली. यापूर्वीच्या सरकारमध्ये निवडणुकांच्या तोंडावर योजनांच्या फाईलवर स्वाक्षरी करणे, निवडणुका आल्या की योजनांची घोषण करणे असे प्रकार चालायचे. त्यांना वाटत होते की, लोक काम नाही तर योजनांच्या घोषणा लक्षात ठेवतात. या सर्व प्रकारामुळे देशात अ‍ॅन्टी इन्क्मबन्सी येते, मात्र भाजपशासीत राज्यात हे सर्व प्रकार होत नसून, आम्ही कामावर भरोसा ठेवतो. त्यामुळे तिथे प्रो इन्क्मबन्सी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Assembly Election Voting 2022 Live Streaming: : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान; येथे जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Hijab : देशामध्ये कुणी काय खायचं? कसे कपडे वापरायचे? हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? मलिकांचा थेट मोदींना सवाल

10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करु, प्रियंका गांधींची मोठी घोषणा, जाहीरनाम्यात आणखी काय?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.