160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप, अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस, अडचणी वाढणार?

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या अडचणी वाढवणारी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याच आरोपांप्रकरणी आयटी विभाग आता त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप, अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस, अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 5:25 PM

मुंबई : राज्य आणि देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना आतापर्यंत इनकम टॅक्स, ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे काही दिग्गज नेत्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. असं असताना आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अबू आझमी (Abu Azmi) यांना आयकर विभाग अर्थात आयटीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या समन्सची बातमी ही फक्त अबू आजमी यांच्यापर्यंत मर्यादित नाही. तर महाराष्ट्रातील समाजवादी पक्षासाठी हा मोठा हादरा मानला जातोय. आयटीने दिलेल्या समन्सनुसार अबू आझमी यांना येत्या 20 एप्रिलला चौकसीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाराणसीतील विनायक ग्रुपमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे.

इनकम टॅक्स विभागाच्या वारणसी शाखेने 160 कोटींच्या टॅक्स चोरी आरोपांच्या प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या प्रकरणात अबू आझमी यांच्यावर अतिशय गंभीर आरोप आहेत. अबू आझमी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये वाराणसीपासून ते मुंबईपर्यंत हवालाच्या माध्यमातून 40 कोटी रुपये प्राप्त केले आहेत, असा गंभीर आरोप अबू आझमी यांच्यावर आहे.

नेमकं प्रकरण काय?

इनकम टॅक्स विभाग खरंतर वारणसी येथील विनायक ग्रुपची चौकशी करत होतं. या चौकशीदरम्यान या प्रकरणात अबू आझमी यांचं नाव समोर आलं. विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, शॉपिंग सेंटर आणि मॉल तयार केले आहेत.

हे सुद्धा वाचा

इनकम टॅक्सच्या तपासात माहिती समोर आली की, विनायक ग्रुपमध्ये सर्वेश अग्रवाल, समीर दोषी आणि आभा गुप्ता हे पार्टनर आहेत. आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. तर गणेश गुप्ता हे अबू आझमी यांचे निकटवर्तीय होते. गणेश गुप्ता यांचं निधन होण्यापूर्वी ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील महासचिव होते. ते मुंबईच्या कुलाबा परिसरातील आझमी यांच्या इमारतीतून आपलं कार्यालयीन कामकाज चालवायचे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आयकर विभागाने तीनही पार्टनरचे जबाब नोंदवल्यानंतर तसेच ईमेलची पडताडणी केल्यानंतर माहिती समोर आली की, विनायक ग्रुप हा चार भागात विभागला गेला होता. ग्रुपच्या फायद्याचा चौथा वाटा हा अबू आझमी यांच्यापर्यंत जायचा. विनायक ग्रुपला 2018 पासून 2022 पर्यंत 200 कोटी रुपयांची कमाई झालीय. यातील 160 कोटी रुपयांचा खुलासा झालाय. तर इतर 40 कोटी रुपये अबू आझमी यांना हवालाच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा संशय आयटीला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमध्ये अबू आझमी यांचा फ्रंटमॅन असं ख्याती असलेला अनीस आझमी हा बिझनेस ऑपरेशन पाहतो. अनीसच्या माध्यमातूनच अबू आझमी यांना हवाला ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवले जात होते, असा आरोप आहे. विशेष म्हणजे इनकम टॅक्सने गेल्यावर्षी अबू आझमी यांच्याशी संबंधित कुलाबा या ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आता अबू आझमी यांना चौकशीचे समन्स पाठवण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.