नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाबाधितांचा आकड्यात दररोज सातत्याने वाढ होत आहे. भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात काल (22 एप्रिल) दिवसभरात 3 लाख 32 हजार 730 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 62 लाख 63 हजार 695 इतकी झाली आहे. तर देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 86 हजार 920 जणांचा मृत्यू झाला आहे. (India Corona Patient Update)
कोरोना रुग्णवाढीचा वेग 14.38 टक्के
भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा बसला आहे. त्यामुळे कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढ वाढला आहे. देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढीनंतर कोरोनावर उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 24 लाख 28 हजार 616 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्णवाढीचा वेग हा 14.38 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या दर सातत्याने खाली होत आहे. आतापर्यंत 1 कोटी 36 लाख 48 हजार 159 कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्के झाला आहे.
देशातील 10 राज्यात सर्वाधिक रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिललेया माहितीनुसार, देशभरात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या दहा राज्यात 75.66 टक्के कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांचा कोरोना सक्रीय रुग्णांमध्ये 59.99 टक्के वाटा आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3 लाख 32 हजार 730 नवीन रुग्ण गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 हजार 263 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासात 1 लाख 93 हजार 279 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
एकूण कोरोनाबाधित 1 कोटी 62 लाख 63 हजार 695 वर आतापर्यंत 1 कोटी 36 लाख 48 हजार 159 जणांना देण्यात आला डिस्चार्ज देशात 24 लाख 28 हजार 616 जणांवर उपचार सुरु आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 86 हजार 920 जणांचा मृत्यू आतापर्यंत देशात 13 कोटी 54 लाख 78 हजार 420 लसीकरण
India reports 3,32,730 new #COVID19 cases, 2,263 deaths and 1,93,279 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,62,63,695 Total recoveries: 1,36,48,159 Death toll: 1,86,920 Active cases: 24,28,616
Total vaccination: 13,54,78,420 pic.twitter.com/LKQMB5pUOE
— ANI (@ANI) April 23, 2021
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढता
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 67 हजार 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 62 हजार 298 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला आहे. काल दिवसभरात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
कालच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 40 लाख 94 हजार 840 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 33 लाख 30 हजार 747 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 99 हजार 858 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (India Corona Patient Update)
संबंधित बातम्या :