AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीच्या तोंडावर IPS देवेन भारतींची अचानक बदली, पोलिस दलात खळबळ

मुंबई : मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची अचानक बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अचानक देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भरती यांची बदली लांबवण्यात आली होती. मात्र नुकतंच निवडणूक आयोगाने देवेन भारतींच्या बदलीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या […]

निवडणुकीच्या तोंडावर IPS देवेन भारतींची अचानक बदली, पोलिस दलात खळबळ
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

मुंबई : मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांची अचानक बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अचानक देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भरती यांची बदली लांबवण्यात आली होती. मात्र नुकतंच निवडणूक आयोगाने देवेन भारतींच्या बदलीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येत्या 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वीच निवडणूक आयोगाद्वारे मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने वेगवेगळया राज्यातल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश दिले आहेत. ज्यामध्ये मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त देवेन भारती यांचे देखील नाव आहे. देवेन भारती यांच्या बदलीनंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त विनय चौबे हे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त पद स्विकारणार आहेत. तर देवेन भारती यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील कोलाकात्याचे पोलिस आयुक्तही बदलण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी डॉ. राजेश कुमार कोलकाताचे नवे पोलीस आयुक्त असतील, तर नटरंजन रमेश बाबू बिधाननगर चे नवे पोलीस आयुक्त असतील. निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या काळातच अचानक बदल्यांचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.