Ekanth Shinde : कोण म्हणतंय दिलासा, बंडाच्या आठव्या दिवशीही शिंदे गट गॅसवर! कुठे, कुणी घातली आडकाठी?

Maharashtra government news today : बंडखोर शिंदे गटाच्या शिवसेनेत परतीचे मार्ग जवळपास बंद झालेत. त्यात शिंदे गट आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करतोय. मात्र...

Ekanth Shinde : कोण म्हणतंय दिलासा, बंडाच्या आठव्या दिवशीही शिंदे गट गॅसवर! कुठे, कुणी घातली आडकाठी?
नेमकं काय घडतंय?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 11:46 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं. या बंडाचा फटका महाविकास आघाडी सरकारला (Maharashtra government news today) थेट बसेल, अशी शक्यता होती पण बंडखोरीचे आठ दिवस उलटून गेले, तरी अद्याप तसं प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. खरंतर एकनाथ शिंदे गटाकडे 51 आमदार आहे. तरिही त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आसल्याचं राजकीय (Maharashtra politics news) विषयांमधील जाणकारांनी म्टलंय. पक्षांतरबंदी कायद्याचा पुरेसा विचार न करता शिंदे गटाने बंडखोरीची पावलं उचलली असल्यानं त्यांची गोची झाली असावी, असा तर्क लढवला जातोय. एकनाथ शिंदे गटासमोर खरंतर दोन पर्याय होते. त्यातील पहिला पर्यात हा भाजपमध्ये जाण्याचा होता. तर दुसरा पर्याय हा प्रहार संघटनेत गट विलीन करण्याचा होता. पण हे दोन्ही पर्याय न वापरता शिंदे गटाला अजूनतरी स्वतंत्र मान्यता मिळवता आलेली नाही.

पक्षच नसल्यानं अडचण!

बंडखोर शिंदे गटाच्या शिवसेनेत परतीचे मार्ग जवळपास बंद झालेत. त्यात शिंदे गट आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करतोय. मात्र हा गट अजूनतरी कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही. त्यामुळे या गटाला सत्ता स्थापनेत भाग घेता येणार नाही. अशातच आता कायदेशीर लढा सत्तास्थापनेवरुन सुरु झालेला आहेत. 11 जुलैला याप्रकरणी पुझील सुनावणी पार पडणार आहे.

आता राज्यपालांसह विधानसभेचे उपाध्यक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेची लढाई निवडणूक आयोग, विधानसभा उपाध्यक्ष आणि राज्यपाल यांच्यात कायदेशीर लढाई सुरु होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसं झाल्यास सत्ता स्थापनेचा तिढा आणखीनच लांबेल, अशी शक्यता कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे गट हा सध्या गुवाहाटीत मुक्कामी आहे. त्यांचा मुक्कामही वाढवण्यात आलाय. आधी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीत तंबू ठोकून सध्या शिंदे गट आहे. एकीकडे शिंदे गटाला भाजप किंवा प्रहार संघटनेत सहभागी होता येत नाही, असा दावा दैनिक सामनातून शिवसनेकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे शिंदे गटाला स्वतंत्र मान्यता मिळणं शक्य नसल्यानं पर्याय न सापडलेल्या बंडखोर आमदारांची कोंडी झालेली दिसतेय.

एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेते किती आमदार?

 आमदाराचं नावमतदारसंघ
1एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडी
2भरत गोगावलेमहाड
3उदय सामंतरत्नागिरी
4संदीपान भुमरेपैठण
5गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण
6दादा भुसेमालेगाव बाह्य
7अब्दुल सत्तारसिल्लोड
8दीपक केसरकरसावंतवाडी
9शहाजी पाटीलसांगोला
10शंभुराज देसाईपाटण
11अनिल बाबरखानापूर
12तानाजी सावंतपरांडा
13चिमणराव पाटीलएरंडोल
14प्रकाश सुर्वेमागाठाणे
15विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम
16संजय गायकवाडबुलडाणा
17प्रताप सरनाईकमाजीवडा
18महेंद्र दळवीअलिबाग
19महेंद्र थोरवे कर्जत
20प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य
21ज्ञानराज चौगुलेउमरगा
22श्रीनिवास वनगापालघर
23संजय रायमूलकरमेहेकर
24बालाजी कल्याणकरनांदेड उत्तर
25शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण
26संजय शिरसाटऔरंगाबाद पश्चिम
27प्रकाश आबिटकरराधानगरी
28योगेश कदमदापोली
29सदा सरवणकरमाहिम
30मंगेश कुडाळकरकुर्ला
31यामिनी जाधव भायखळा
32लता सोनावणेचोपडा
33किशोरी पाटीलपाचोरा
34रमेश बोरनारे वैजापूर
35सुहास कांदे नांदगाव
36बालाजी किणीकरअंबरनाथ
37दिलीप लांडेचांदिवली
38आशिष जयस्वालरामटेक
39महेश शिंदेकोरेगाव

एकनाथ शिंदे गटाकडे अपक्ष किती आमदार?

 आमदाराचं नावमतदारसंघ
1बच्चू कडू
2राजकुमार पटेल
3राजेंद्र यड्रावकर
4चंद्रकांत पाटील
5नरेंद्र भोंडेकर
6किशोर जोरगेवार
7मंजुळा गावित
8विनोद अग्रवाल
9गीता जैन
Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.