जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आज (17 जून) अखेर भाजपच्या संसदीय बोर्डाने  जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड
Follow us
| Updated on: Jun 17, 2019 | 8:29 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर 30 मे रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह मंत्रिमंडळातील 57 सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची वर्णी लागली आहे. अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आज (17 जून) अखेर भाजपच्या संसदीय बोर्डाने जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान जे. पी. नड्डा यांना उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. उत्तर प्रदेशात भाजपने 64 जागांवर विजय मिळवला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या. मात्र त्या तुलनेत यंदा भाजपला 9 जागा कमी मिळाल्या आहेत.

दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांना उत्तरप्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अमित शाह यांनी मेहनत आणि राजकीय खेळीच्या जोरावर भाजपला 73 जागा मिळवून दिल्या होत्या. मोदी सरकार स्थापन होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी  भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र त्यानंतर 2014 नंतर अमित शाह यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

यंदाच्या निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता कोण होणार, याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आज (17 जून) अखेर भाजपच्या संसदीय बोर्डाने जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. आज (17 जून) नवी दिल्लीच्या भाजप कार्यालयात संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

“भाजपने अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांची गृहमंत्री पदी नियुक्ती केली. तसेच गृहमंत्री अमित शाहांनी सुद्धा माझ्यावरची अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षातील इतर नेत्याला द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आज भाजपच्या संसदीय बोर्डाने भाजप नेते जे.पी.नड्डा यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी दिली आहे.”

कोण आहेत जे.पी.नड्डा?

  • जे.पी.नड्डा हे हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत
  • 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जे.पी.नड्डा यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
  • जे. पी. नड्डा यांचा जन्म आणि शिक्षण पाटणा येथे झाला आहे. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशात स्थायिक झाले
  • हिमाचल प्रदेशातील विद्यापीठातून त्यांनी LLB ची पदवी घेतली आहे.

संबंधित बातम्या :

अमित शाह गृहमंत्रिपदी, भाजपाध्यक्ष पदाची धुरा नड्डांकडे?

देशभरात एकच चर्चा, अमित शाहांना कोणतं मंत्रिपद?

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी पंकजा मुंडेंसह तीन नावं चर्चेत!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.