AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक, खडसे-महाजन-गुलाबरावांची एकत्र हजेरी?

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्याबाबत होणाऱ्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसह गुलाबराव पाटील, तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचीही उपस्थिती या बैठकीला असेल

जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक, खडसे-महाजन-गुलाबरावांची एकत्र हजेरी?
Eknath Khadse, Girish Mahajan , Gulabrao Patil
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 9:30 AM
Share

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Jalgaon District Bank Election) सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात सर्वपक्षीय नेत्यांची आज (सोमवारी) दुपारी बैठक होणार आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), भाजपचे ‘संकटमोचक’ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), तसेच शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे तीन पक्षांचे तीन दिग्गज नेते यावेळी समोरासमोर येण्याची चिन्हं आहेत.

निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्वपक्षीय चर्चा

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्याबाबत होणाऱ्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसह गुलाबराव पाटील, तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचीही उपस्थिती या बैठकीला असेल. बऱ्याच दिवसांनी ही नेते मंडळी एकत्र बैठकीला हजेरी लावण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते खरंच हजर राहतील का? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीचे सूत, भाजपबाबत साशंकता

दुसरीकडे, जिल्हा बँकेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत पुढाकार घेतला आहे. मात्र, भाजपच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐन वेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही आहे. गिरीश महाजन यांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी होतात का? हे देखील आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी

दरम्यान, महाराष्ट्रातील 15 जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट कायम आहे. या बँकांच्या अंतिम मतदार याद्या 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून

कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या निवडणुका कोरोनाची तिसरी लाट येण्यावरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या सहकारी बँका

पहिल्या टप्प्यात राज्यातील 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा बँकांचा समावेश आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या आहेत. मात्र, 9 ऑगस्टच्या आदेशानुसार जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासूनच पुढे कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

15 जिल्हा बँकांच्या निवडणुकांना परवानगी, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट कायम

पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, इथे पाहा संपूर्ण यादी

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार? जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे सहकार विभागाचे आदेश

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.