पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, इथे पाहा संपूर्ण यादी

पुणे महानगर नियोजन समितीच्या (Pune Metropolitan Planning Committee) निवडणुकीची (Elections) अंतिम मतदार यादी (Votes List) आज जाहीर करण्यात आली आहे. पुढच्या एक ते दोन महिन्यांच्या काळात नियोजन समितीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, इथे पाहा संपूर्ण यादी
पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीसाठी मतदार यादी

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या (Pune Metropolitan Planning Committee) निवडणुकीची (Elections) अंतिम मतदार यादी (Votes List) आज जाहीर करण्यात आली आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. त्यानुसार त्यामुळे पुढच्या एक ते दोन महिन्यांच्या काळात नियोजन समितीची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. (Voter list for Pune Metropolitan Planning Committee elections announced, elections likely in November)

नियोजन समितीच्या निवडणुकीत 978 मतदार

महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पीएमआरडीएच्या हद्दीतल्या ग्रामीण (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगपालिका) गटातून एकूण 978 मतदार आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळून 285 मतदार आहेत. सोबतच नगर परिषदांमध्ये 114 तर ग्रामीण भागामध्ये 579 मतदार आहेत.

मतदार यादीबाबत हरकती

पीएमआरडीएचा विस्तार पाहिला तर त्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा भौगोलिक वाटा मोठा आहे. परंतु प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी आहे. नियोजन समितीवर मनपा क्षेत्रातून 22 मतदार निवडून द्यायचे आहेत. ग्रामीण क्षेत्रातून 7 तर नगरपरिषद क्षेत्रातून एक सदस्य निवडला जाणार आहे. या मतदार यादीबाबत काही हरकतीही पीएमआरडीएला प्राप्त झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते आणि नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

कुठे पाहता येणार मतदार यादी?

जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे तसेच मुख्याधिकारी लोणावळा, शिरूर, तळेगाव, आळंदी, चाणक, राजगुरूनगर, सासवड नगर परिषद या कार्यालयांच्या सूचना फलकावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच http://divcommpune.in या वेबसाईटवरही मतदार यादी पाहता येईल.

शहराप्रमाणे ग्रामीण भागाला मतदानाचा अधिकार का नाही?

शहरी भागात सर्व नगरसेवकांना महानगर नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रमुख वगळता इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे नगरसेवकांप्रमाणे ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार का नाही असा सवाल करण्यात येतोय. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनाही मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली जात आहे.

कोणत्या तालुक्यातल्या किती गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश?

पीएमआरडीएमध्ये पुणे जिल्ह्याच्या वर्तुळाकार समाविष्ठ होणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांतल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरासह मावळ तालुक्यांतल्या 189, मुळशी 144, आणि हवेली तालुक्यातल्या सर्व 108, गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच खेड 114, शिरूर 68, भोर 53, वेल्हा 52, दौंड 51 आणि पुरंदर तालुक्यातली 38 अशी एकूण 817 गावं पीएमआरडीएमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे महानगर नियोजन समितीत ग्रामीण भागाबाबत दुजाभाव, 817 गावांमधून केवळ 7 सदस्यांची होणार नेमणूक

Pune Metro Update | मेट्रोच्या कामामुळे छत्रपती संभाजी महाराज पूल रात्री बंद!

राणेंमुळे भाजपची गोची? चंद्रकांत पाटील म्हणतात, राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI