AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…नाहीतर वडिलांच्या पेन्शनवरच जगत असते; गिरीश महाजनांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा टोला

Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन यांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा टोला; म्हणाले...

...नाहीतर वडिलांच्या पेन्शनवरच जगत असते; गिरीश महाजनांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा टोला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 25, 2023 | 3:29 PM
Share

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “गिरीश महाजन यांना आम्हीच मोठे केलं हे संपूर्ण जामनेर तालुक्याला माहिती आहे. गिरीश महाजन चांगला मुलगा आहे, म्हणून त्यांना आम्हीवर आणण्याचा प्रयत्न केला. नाहीतर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवरच जगला असता”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

“मी गेलो म्हणून गिरीश महाजन फरदापूरला वाचले. प्रत्यक्षात मी पाहिलं होतं. त्या महिला कुठल्या अवस्थेत होत्या आणि गिरीश महाजन कुठल्या अवस्थेत होते हे माहिती आहे. पोलीस निरीक्षकाने महाजनांच्या कानाखाली वाजवली होती. मी होतो म्हणून ते वाचले. माझीच मोठी चूक झाली त्यावेळेस गिरीश महाजन यांनामध्ये टाकलं असतं तर आज बर झालं असतं”, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात महाविकास आघाडीचं उपोषण सुरू आहे. शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी मविआ एक दिवसीय उपोषण करत आहे. उपोषणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीच युवकचे अध्यक्ष महबूब शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. कांदा, कापूस आणि इतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. तिथे खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. त्यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजनने माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या. माझ्या मागे ईडी लावली. सीबीआय लावलं आणि उलट मला विचारतो की माझ्यामागे मोक्का लावला का? तू ईडी लावली म्हणून तुझ्या मागे मोक्का लावला, असं खळबळजनक विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

सद्यस्थितीत सरकारच्या विरुद्ध जो बोलतो, त्याच्याविरोधात ईडी तसंच सीबीआय आणि इतर सरकारी यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जातो. गिरीश महाजनने तर माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या. सरकारमध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही. सत्तेचा माज हा फार काळ टिकत नाही, असं खडसे म्हणालेत.

आता तर न्यायालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस दिली असल्याचं वक्तव्यसुद्धा यावेळी एकनाथ खडसे यांनी केलंय.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा