फोटो मॉर्फ करुन खालच्या पातळीवरील टीका करणाऱ्यांना पैसे कोणी पुरवले? जयंत पाटलांचा भाजपला सवाल

| Updated on: May 03, 2020 | 8:50 PM

"कोरोनाच्या कठीण काळात भाजपच्या नेत्यांचं लक्ष राजकारण करण्याकडे जास्त होतं, म्हणून लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली"

फोटो मॉर्फ करुन खालच्या पातळीवरील टीका करणाऱ्यांना पैसे कोणी पुरवले? जयंत पाटलांचा भाजपला सवाल
Follow us on

सोलापूर : “कोरोनाच्या कठीण काळात भाजपच्या नेत्यांचं लक्ष राजकारण (Jayant Patil Criticize BJP) करण्याकडे जास्त होतं, म्हणून लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली”, असं म्हणत जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर पलटवार केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने काल समाजमाध्यमांवर भाजप नेत्यांवर चालू असलेल्या ट्रोलिंग विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, यावरुन जयंत पाटील यांनी ही टीका केली. सोलापूर शासकीय विश्रामगृहात (Jayant Patil Criticize BJP) ते माध्यमांशी बोलत होते.

“ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात फोटो मॉर्फ करुन टीका करण्यात आली. त्यावेळी आम्ही तक्रार द्यायला गेल्यावर आमच्यापैकी कोणाची ही एफआयर दाखल करुन घेण्यात आली नाही. मात्र, जर आपल्या एखाद्या वक्तव्याचा जनता विरोध करत असेल, तर त्याला ट्रोलिंग समजण्याची गरज नाही. उलट निवडणुकींच्या काळात काही विशिष्ट पेज चालवून खालच्या पातळीवर टीका केली जात होती. त्यांना पैसे कोण पुरवत होते”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

“राष्ट्रवादी कोणत्याही प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांचे समर्थन करत नाही. त्यांनी दिलेल्या तक्रारी योग्य असतील, तर त्याविरोधात कारवाई केली जाईल. मात्र, आपल्या काळात काय चालायचं याचाही विचार करायला हवा”, असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर टीका केली.

दरम्यान, आयएफसी सेंटर मुंबईवरुन गुजरातला हलविल्याच्या निर्णयावरुन देखील जयंत पाटील यांनी टीका केली. “विधानसभेत आम्ही या विरोधात प्रश्न विचारला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केलं नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार तसेच तत्कालीन राज्य सरकार काम करत आहे”, अशी टीका जयंत पाटील (Jayant Patil Criticize BJP) यांनी केली.

जयंत पाटलांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी”, अशी मागणी जयंत पाटलांनी केला.

जयंत पाटलांची फेसबुक पोस्ट

भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.

आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ?

गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये.

आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा.??

 

Jayant Patil Criticize BJP

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

विधानपरिषदेच्या तिकीटासाठी मोर्चेबांधणी सुरु, विदर्भातील काँग्रेस इच्छुक नेत्यांच्या भेटीला

काहींचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होतं, आता झालं गेलं विसरुन बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न : जयंत पाटील