मध्यरात्री स्टिअरिंग हाती, यवतमाळमध्ये जयंत पाटलांची युवा पदाधिकाऱ्यांसोबत लाँग ड्राईव्ह

युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं, म्हणून जयंत पाटील मध्यरात्री पुन्हा बाहेर पडले. (Jayant Patil Long Drive)

मध्यरात्री स्टिअरिंग हाती, यवतमाळमध्ये जयंत पाटलांची युवा पदाधिकाऱ्यांसोबत लाँग ड्राईव्ह
| Updated on: Jan 30, 2021 | 1:50 PM

यवतमाळ/मुंबई : युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मध्यरात्री स्वतः गाडी चालवत बाहेर पडले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात जयंत पाटलांनी युवा पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली. स्टेअरिंग हातात धरलेले जयंत पाटलांचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत. (Jayant Patil drives car talks with NCP officials in Yawatmal Long Drive)

युवा पदाधिकाऱ्यांसोबत जयंत पाटलांची चर्चा

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात दिवसभर पक्षाचा आढावा, सभा, बैठका आणि पुन्हा प्रवासात पदाधिकारी, जनतेशी गाठीभेटी असा जयंत पाटील यांचा व्यस्त दिनक्रम आहे. सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं, म्हणून जयंत पाटील मध्यरात्री पुन्हा बाहेर पडले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानानिमित्ताने दौर्‍यावर आहेत.

दोन तास जयंत पाटलांसोबत नाईट आऊट

पदाधिकारी दिवसभर सोबत असले तरी त्यांच्याशी पक्षाच्या बांधणीबाबत नीट चर्चा करता येत नाही, हे ध्यानात घेऊन जयंत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 3.17 वाजेपर्यंत जवळपास अडीच तास स्वतः ड्रायव्हिंग करत चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वागणुकीने युवा टीम प्रभावित झाली आणि त्यांनी आपल्याला आलेला अविस्मरणीय क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा दोन दिवसांपूर्वी सुरु झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली जिल्ह्यातून या यात्रेची सुरुवात झाली. “पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, पक्ष संघटनेला बळकटी देणे” याच उद्देशानं परिवार संवाद यात्रा सुरु करत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. या परिवार संवाद यात्रेदरम्यान इतर पक्षातील काही कार्यकर्ते आणि नेते पक्ष प्रवेश करणार, असंही जयंत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘घरांच्या प्रश्नांबाबत’ असंख्य महिला मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतात तेव्हा…

जयंत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन?

(Jayant Patil drives car talks with NCP officials in Yawatmal Long Drive)