AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्याचा विचार पण….,खडसेंच्या राजकीय भवितव्याबद्दल राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांच्या राजकीय भविष्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलंय. (Jayant Patil Eknath Khadse)

खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्याचा विचार पण....,खडसेंच्या राजकीय भवितव्याबद्दल राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे
| Updated on: Feb 13, 2021 | 7:39 AM
Share

जळगाव  : भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो राष्ट्रवादीच्या बॅनरवर फोटो नसल्यामुळे अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील गटबाजीसुद्धा यातून उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपलं मत व्यक्त केलंय. खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्याचा आमचा विचार होता. त्यांच्या नावाची आम्ही शिफारसही केली होती. मात्र, राज्यपालांनी शिफारस केलेल्या नावांवर अद्याप निर्णय घेतला नाही, असे मत जयंत पाटील यांनी नोंदवले. तसेच, हा निर्णय लांबणीवर ठेवणे म्हणजे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. (Jayant Patil on Eknath Khadse political career)

भाजप बहुजनांना काम संपलं की बाजूला सारलं जातं

यावेळी बोलताना त्यांनी खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशावर स्पष्टीकरण दिले. तसेच भाजपमधील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपत अन्याय झालेला होता. खडसेंना ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली होती, ते महाराष्ट्राच्या बहुजन समाजाला आवडले नाही. सत्ता आल्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक बहुजन लोकांना बाजूला करतात. भारतीय जनता पार्टीने हे पुन्हा सिद्ध केले आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे असो एकनाथ खडसे किंवा भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ही त्याची उदाहरणं आहेत. जेव्हा गरज असेल तेव्हाच भारतीय जनता पार्टी बहुजनांना पायघड्या घालतात. नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. जेवा काम संपले तेव्हा बहुजनांना बाजूला करतात,” अशी घणघाती टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच, भाजपच्या याच स्वभावामुळे खडसे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक बहुजन भाजपपासून दूर चालले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

खडसेंच्या पाठीमागे उभा राहणार

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळालेली असून जमीन खरेदीबाबत त्यांची चौकशी सुरु आहे. यावर बोलताना खडसे यांच्यावरील सर्व आरोप चुकीचे असून राष्ट्रवादी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असे जयंत पाटील यांनी सांगितलं. “ईडीची प्रथा आणि परंपरा बघितली तर भाजपच्या विरोधात जे जातील त्यांच्या मागे ईडी लागल्याचं दिसून आलं आहे. बऱ्याच नेत्यांच्या बाबतीत असे झाले. खडसे यांच्या मागे ईडी लागली त्यात आचार्य नाही. खडसेंवरील आरोपांत काही तथ्य नाही. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोट्या स्वरूपाचे आरोप आहेत. खडसेंना ईडीची चौकशी लावून त्यांना त्रास देण्यात आला. तरीसुद्धा राष्ट्रवादी खडसे पक्ष यांच्या पाठीमागे उभा राहिला, असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. यावेळी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं. या प्रकारानंतर येथे पक्षांतर्गत गटबाजी उघड झाल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या :

जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब; खडसेंच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची गटबाजी

(Jayant Patil on Eknath Khadse political career)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.