मंत्री संजय राठोड प्रकरणी जयंत पाटील म्हणतात, ‘एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते!’

| Updated on: Feb 13, 2021 | 7:31 AM

संजय राठोड यांचं पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. Jayant Patil on Sanjay Rathod

मंत्री संजय राठोड प्रकरणी जयंत पाटील म्हणतात, एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते!
Jayant patil And Sanjay Rathod
Follow us on

जळगावपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan suicide) भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी लावून धरली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Jayant Patil on Sanjay Rathod over puja Chavan Suicide)

संजय राठोड यांचं या प्रकरणात थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पाठीमागे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते, असं जयंत पाटील म्हणाले.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती मला काहीच माहिती नाही मी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत आहे. मंत्रीमहोदयांचं थेट नाव घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. पाठीमागच्या काळातील घटना पाहिल्या की लक्षात येईल एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते. त्यामुळे थोडंसं संयमाने घेण्याची गरज आहे. पोलिस याबाबतचा सविस्तर तपास करतील, असं जयंत पाटील म्हणाले.

वाट कसली बघता, राठोडांच्या मुसक्या आवळा : चित्रा वाघ

“पूजा चव्हाणची आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात ज्या काही अपडेट येत आहेत ते व्हायरल होत आहे. काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. त्या सर्व क्लिप धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोख मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. भाषणात महिला सुरक्षेवर बोलणं सोपं असतं. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत बोलताना दिली.

कोणत आहेत संजय राठोड?

  • संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  • शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  • फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
  • संजय धुळीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
  • ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
  • 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
  • 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
  • यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली.
  • 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
  • आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे वनमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नेमकं प्रकरणं काय? 

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

(Jayant Patil on Sanjay Rathod over puja Chavan Suicide)

हे ही वाचा :

वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा : चित्रा वाघ

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

बँक खातं भरलेलं असावं, नाती समृद्ध असावी म्हणाणाऱ्या पूजाने टोकाचं पाऊल का उचललं? बोलक्या इन्स्टाग्राम पोस्टनी चटका लावला!