पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसतो आहे. | Sanjay Rathod

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल
संजय राठोड, वनमंत्री
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 8:53 PM

मुंबई: पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूसंबधीच्या ऑडिओ क्लीप्स समोर आल्यानंतर भाजपचे नेते शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, इतक्या सगळ्या गदारोळानंतरही संजय राठोड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Shivsena MLA Sanjay Rathod is not reachable after buzz about Pooja Chavan Suicide Case)

गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून संजय राठोड यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, संजय राठोड यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळे आता संजय राठोड आपले मौन नक्की कधी सोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढला, राठोडांची विकेट पडणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसतो आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आतापर्यंत दबक्या आवाजात संजय राठोड यांचं घेतलं जाणारं नाव आता उघडपणे घेतलं जात आहे. त्यामुळेच संजय राठोड प्रकरणी ठाकरे सरकारवर दबाव वाढतो आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?

पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ११ ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.

भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं. पण आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे, कसली वाट बघताय? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी बहिणही सरसावली, इन्स्टावर भावूक पोस्ट, माझी बहिण वाघिण होती

(Shivsena MLA Sanjay Rathod is not reachable after buzz about Pooja Chavan Suicide Case)

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.