AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांची आणि आमची जुनी ओळख; अजित पवार यांच्याकडे पाहत जयंतरावांचा चिमटा

मुख्यमंत्र्यांनी नाव घेताच अजित पवार यांनी उभं राहून हात जोडत सर्वांना अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार खाली बसत असतानाच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.

त्यांची आणि आमची जुनी ओळख; अजित पवार यांच्याकडे पाहत जयंतरावांचा चिमटा
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2023 | 4:02 AM
Share

मुंबई | 17 जुलै 2023 : राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या अधिवेशनात राष्ट्रवादीचा एक गट दुसऱ्या गटाला कसा रिस्पॉन्स देतो, त्यांच्यात टोलेबाजी रंगतेय का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. टोलेबाजी करण्यात तरबेज असलेले राष्ट्रवादीत अनेक नेते आहेत. जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते कोट्या करण्यात एक्स्पर्ट आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

अखेर तो क्षण आला…

सकाळी बरोबर सव्वा दहा वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झालं. प्रथा आणि पंरपरेनुसार नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून द्यायची असते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिलीच ओळख अजित पवार यांची करून देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि वित्त असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याकडे पाहिलं. ही संधी हेरून देवेंद्र फडणवीस यांनी नाव सांगा अशी विनंती मुख्यमंत्र्याना केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचं नाव घेतलं.

दादाही हसले

मुख्यमंत्र्यांनी नाव घेताच अजित पवार यांनी उभं राहून हात जोडत सर्वांना अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार खाली बसत असतानाच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. त्यांची-आमची जुनी ओळख आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटील यांनी हा टोला लगावताच सभागृहात एकच खसखस पिकली. यावेळी अजित पवारही गालातल्या गालात मिश्किल हसले.

नऊ मंत्र्यांचा परिचय

अजित पवार यांचा परिचय करून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इतर आठ मंत्र्याचा एक एक करून परिचय करून दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा अत्राम, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आदिती तटकरे आदी मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला. तसेच त्यांच्या खात्याचीही माहिती दिली.

कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.